Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जाती प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन

 जाती प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन


सांगली दि. 26  : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत दि. 30 एप्रिल 2022 पर्यंत जात पडताळणीची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. दि. 27 एप्रिल रोजी तासगाव तालुक्यात गर्व्हनमेंट रेसिडन्स वूमन लिटेक्निक कॉलेस तासगाव येथे तर दि. 28 एप्रिल रोजी राणी सरस्वती ज्यु. कॉलेज सांगली येथे जात प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांनी केले आहे.

अकरावी व बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेले विद्यार्थी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यात इच्छुक असलेले विद्यार्थी, प्राधान्याने विज्ञान शाखेतील विद्यार्थी/सीईटी देणारे/डिप्लोमा तृतीय वर्षात शिकत असलेल विद्यार्थ्यांनी वरीलप्रमाणे नमुद महाविद्यालयात सकाळी ११ ते १२ या वेळेत उपस्थित राहून जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली यांच्यावतीने करण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.