Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आम आदमी पार्टी सांगली जिल्ह्यातर्फे कार्यक्रम

आम आदमी पार्टी सांगली जिल्ह्यातर्फे कार्यक्रम


दिनांक २९.०४.२२ : आम आदमी पार्टी सांगली जिल्ह्यातर्फे दैवज्ञ भवन, कोल्हापूर रोड येथे भव्य पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम हा आम आदमी पार्टीच्या राज्य समिती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी आम आदमी पार्टीचे राज्य प्रभारी श्री. दीपक सिंगला, राज्य निवडणूक प्रमुख श्री महादेव नाईक, प्रदेशाध्यक्ष श्री. रंगा राचुरे, राज्य सचिव श्री. धनंजय शिंदे, राज्य संघटक श्री. विजय कुंभार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. संदीप देसाई, उपाध्यक्ष सुदर्शन कदम व सचिव श्री. वसीम मुल्ला हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


पंजाब निवडणुकीतील अभुतपुर्व निकाला नंतर सर्व सामान्य जनतेत आम आदमी पार्टीचे आकर्षण वाढले असून लवकरच देशातील जनतेसाठी आम आदमी पार्टी हा सक्षम पर्याय निर्माण झाला आहे. लवकरच महाराष्ट्रात देखील आम आदमी पार्टी किमया घडवेल अशी आशा राज्य प्रभारी श्री. दीपक सिंगला यांनी व्यक्त केली. तर महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्व निवडणूका आम आदमी पार्टी सक्षमपणे लढेल असा विश्वास राज्य निवडणूक प्रमुख श्री. महादेव नाईक यांनी सभेला संबोधित करताना सांगितले. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश करून घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे संयोजन श्री. वसीम मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. या कार्यक्रमात पश्चिम महाराष्ट्र हेल्थ विंग अध्यक्ष डॉ. अमोल पवार, जिल्हा सचिव श्री. अशपाक शेख, मिरज तालुका अध्यक्ष श्री. आरिफ मुल्ला, जिल्हा युथ विंग अध्यक्ष श्री. सागर भोसले, निसार मुल्ला, कृष्णा अलदर, संग्राम मोरे, डॉ. परमानंद भोसले, राम पाटील, महेश गायकवाड, श्रीरंग ढोले, दरेश्वर चौगुले, तौफिक हवालदार, विनोद मोरे, फय्याज सय्यद, झोहेब मुल्ला, रवी बनसोडे, श्रीकांत चंदनवाले, संभाजी मोरे, शिवाजी गायकवाड, इमरान पठाण, संतोष मगदूम, असिफ सारवान श्रीमती मनीषा माने, विपुल थोरात व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.