Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते

महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री  जयंत  पाटील  यांच्याहस्ते


सांगली, दि. 28, : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 व्या वर्धापन दिनाच्या ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ रविवार, दिनांक 1 मे 2022 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंड विश्रामबाग, सांगली येथे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते होणार आहे.  

या कार्यक्रमास  लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, विविध संस्था, माध्यम प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी , नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. ध्वजारोहणाचा समारंभ सुरु होण्यापूर्वी 10 मिनिटे आसनस्थ व्हावे व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये. तसेच कोविड-19 च्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या सर्व सुचनांचे पालन करावे. सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियम पाळणे बंधनकारक राहील, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.