दक्षिण भारत जैन सभा व जैन महिला परिषदेच्या शंभराव्या अधिवेशनाचे महत्त्व..
सांगली दि. २९ : दक्षिण भारत जैन सभा व जैन महिला परिषदेच्या शंभराव्या अधिवेशनाचे महत्त्व.. सभा व महिला परिषद आणि जैन श्राविकाश्रमाचे जैन समाज, महिला उन्नती क्षेत्रात झालेल्या कामाचा आढावा घेऊन महिलांनी मोठ्या संख्येने अधिवेशनाला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यासाठी महिला परिषद व आश्रमाच्या कर्तबगार महिलांनी मिरज तालुक्यातील गावे पिंजून काढली. त्यांच्या बोलण्यातून स्व. गोदूबाई उपाध्ये व स्व. कळंत्रे अक्कांचा साक्षात्कार होऊन उपस्थित महिला भारावून गेल्या.
सर्व आदरणीय महिला.. भारती चौधरी, कमल मिणचे, मंगल चव्हाण, विजया कर्वे, गीतांजली बोरगावे, अर्चना कवठेकर, रेखा पाचोरे, सरोजिनी पाटील इ.नी सावळवाडी, माळवाडी, दुधगाव, वाळवा कोट व हाळ भाग, मौजे डिग्रज, सलगरे, मिरज, सुभाषनगर, गुंडेवाडी, हिंगणगाव, खंडेराजुरी व मालेगाव या भागात जैन महिलांच्या बैठका घेऊन अधिवेशन उपस्थिती व अर्थसहाय्य याबाबत मार्गदर्शन केले.
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचे भारती चौधरी यांनी सांगितले. या निमित्ताने महिलांचे चांगलेच प्रबोधन होऊन सभा व महिला परिषदेच्या प्रवाहात सामील होण्यासाठी महिला मोठय़ा प्रमाणात उत्सुक असल्याचे भारती चौधरी व कमल मिणचे यांनी सांगितले. हा झंजावात अधिवेशनात महिलांचा सहभाग वाढवणारा निश्चितच आहे. सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील म्हणाले, ''दक्षिण भारत जैन सभा आणि जैन महिला परिषदेच्या दि. १४ व १५ मे २०२२ रोजी सांगलीत संपन्न होणाऱ्या अधिवेशनास सांगली जिल्ह्य़ातील महिला मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत. यासाठी जैन श्राविकाश्रम व जैन महिला परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अनेक गावांमध्ये जाऊन जनजागृती केली आहे. अधिवेशनाचे महत्त्व व उपस्थिती याबाबत महिलांमध्ये चांगले प्रबोधन झाले आहे. ''
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.