Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारू आणण्यासाठी संशयितासह त्याच्या पत्नीवर दबाव

दारू आणण्यासाठी संशयितासह त्याच्या पत्नीवर दबाव



मुख्य सूत्रधार सदुनि बिनधास्तच, वरीष्ठ वाचवण्याचा सदुनिला ठाम विश्वास

सांगली : इस्लामपूर येथील गोवा बनावट दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या त्या सदुनिने एका संशयितासह त्याच्या पत्नीला गोव्याहून दारू आणण्यास भाग पाडल्याची चर्चा  आहे. या सदुनिने येलूरमधील एका बार चालकाला हाताशी धरून हे प्रकरण घडवून आणल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान येलूरमधील त्या बारवर मार्च महिन्यात गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या सापडल्या होत्या. त्याच्यावर कारवाई केली की नाही हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. यातील मुख्य सूत्रधार असलेला सदुनि इतके होऊनही बिनधास्त असल्याचे दिसत आहे. त्याला वरीष्ठ वाचवतील असा ठाम विश्वास असल्यानेच तो बिनधास्त असल्याची चर्चा एक्साईजच्या वतुर्ळात आहे. 

येलूर फाट्यावरील एका पेट्रोल पंपावर हा सगळा प्रकार घडला. यावेळी एक संशयित तेथे पत्नीसह उपस्थित होता. त्याच्या पत्नीसमोरच हा सगळा प्रकार घडल्याचे प्रत्यक्षदशीर्नी सांगितले. या संशयिताच्या पत्नीचे काही जवळचे नातेवाईक वरीष्ठ शासकीय अधिकारी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तो संशयित पत्नीसमवेत नातेवाईकांकडे जाऊन उठाठेवी करणाऱ्या सदुनिबाबत अति वरीष्ठ पातळीवर तक्रार करणार असल्याचे समजते. 

सांगली दपर्ण ने हे प्रकरण उजेडात आणल्यानंतर एक्साईजच्या सांगलीतील अधिकाऱ्यांनी त्या संशयिताचा इन कॅमेरा जबाब घेतल्याचे समजते. तसेच या प्रकरणाबाबत बाहेर कुठेही वाच्यता न करण्याबाबत दबाव टाकल्याचीही चर्चा आहे. 

या सवर् घटनांमुळे तो सदुनि अजूनही बिनधास्तच आहे. वरीष्ठ त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करतील असा त्याला ठाम विश्वास असल्याचेही हा सदुनि खात्यातील काहीजणांकडे बोलल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या सदुनिवर कडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.