महापालिकेच्या ४८ नव्या वाहनांचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्याहस्ते लोकार्पण
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने विविध कामासाठी नव्याने खरेदी केलेल्या 48 वेगवेगळ्या वाहनांचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.
महापालिकेच्या विविध विभागासाठी अनेक अत्याधुनिक वाहने महापालिका प्रशासनाने खरेदी केली आहेत. या सर्व वाहनांचे आज लोकार्पण करण्यात आले. यावेळी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, उपमहापौर उमेश पाटील, स्थायी सभापती निरंजन आवटी, गटनेते विनायक सिंहासने, महिला बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे पाटील, नियोजन समिती सदस्य संजय बजाज, अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, चंद्रकांत आडके, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे , तेजस शहा, माजी महापौर गीता सुतार, सुरेश पाटील, नगरसेवक विष्णू माने, शेखर माने, नगरसेविका शुभांगी साळुंखे, नसीम नाईक, स्वाती पारधी, राष्ट्रवादीचे नेते पै राहुल पवार, राहुल ढोपे यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेने खरेदी केलेल्या वाहनांमध्ये ऑटो टिप्पर (घंटागाडी), ई बाईक, डंपर प्लेसर, सक्शन व्हॅन, व्हील्ड स्किड स्टीअर लोडर, सक्शन कम जेटींग मशिन, ट्रॅक्टर आणि ट्रॉली रोड रोलर, हाय मास्क आस्का लाईट,
शक्तीमान बागाविभाग, मोबाईल लॅडर विद्युत विभाग, नाला मॅन मशिन, रिसायकलर जेट मशिन, रेस्क्यू व्हॅन आशा एकूण 48 वाहनांचा समावेश आहे. या पैकी काही यंत्रणांची प्रात्यक्षिकेही पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी पाहून कौतुक केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.