Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तीन वर्षांपासून सरकारी वकिलाची नियुत्ती नाही, उद्ध्वस्त कुटुंबांना न्याय कधी मिळणार?

 तीन वर्षांपासून सरकारी वकिलाची नियुत्ती नाही, उद्ध्वस्त कुटुंबांना न्याय कधी मिळणार?


सांगली : राज्याला हादरवून सोडलेल्या सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणाचा खटला सुमारे तीन वर्षांपासून सरकारी वकिलाच्या नेमणुकी अभावी प्रलंबित आहे. पाच वर्षापूर्वी बेकायदेशीर गर्भपात करताना मरण पावलेल्या स्वाती जमदाडे यांच्या आई वडिलांनी आज सांगलीच्या पोलीस अधीक्षक यांना भेटून सरकारी वकील नेमण्यासाठी निवेदन दिलं आहे.सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे पाच वर्षांपूर्वी, बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान केंद्र सुरू होते. गर्भलिंग निदान करून मुलगी असेल तर गर्भपात केला जात होता. दवाखान्याच्या परिसरात पुरलेले सुमारे शंभरपेक्षा अधिक मृत भ्रूण आढळून आले होते. या प्रकरणी डॉक्टर म्हैसाळ, बाबासाहेब खिद्रापुरे यांच्यासह १४ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. सुमारे तीन वर्षे सरकारी वकिलांच्या नेमणुकीअभावी हा खटला प्रलंबित आहे.



दरम्यान, या अगोदर पुणे येथील ज्येष्ठ विधिज्ञ हर्षल निंबाळकर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांनी यापूर्वीच सरकारी वकील म्हणून वकीलपत्र स्वीकारण्यास नकार दिला आहे. मात्र त्यांच्या जागी शासनाने दुसऱ्या विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केलेली नाही. सुमारे तीन वर्षे सरकारी वकिलाच्या नेमणुकीअभावी हा खटला प्रलंबित आहे. काही दिवसांपूर्वी म्हैसाळ येथील स्त्रीभ्रूण खटल्यात सरकारी वकील नेमणुकीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांना, सत्र न्यायालयाने नोटीस सुद्धा बजावली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.