Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कृषि विज्ञान केंद्रामध्ये "शेतकरी मेळावा” संपन्न

 कृषि विज्ञान केंद्रामध्ये "शेतकरी मेळावा” संपन्न


आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने "किसान भागिदारी प्राथमिकता हमारी अभियाना अंतर्गत वसंत-प्रकाश विकास प्रतिष्ठान संचालित, कृषि विज्ञान केंद्र, कांचनपूर येथे शेतकरी मेळावा साजरा केला.

या मेळाव्यात कृषि विज्ञान केंद्राच्या अध्यक्षा श्रीमती शैलजाभाभी पाटील यांनी शेतीमधील महिलांचा सहभाग या विषयावर मार्गदर्शन केले. श्री. विशाल(दादा) पाटील यांच्या हस्ते शेतकरी उप्तादक कंपनी व प्रगतीशील शेतक-यांचा सत्कार करण्यात आला.


डॉ. सचिन महाजन, शास्त्रज्ञ, कृषि संशोधन केंद्र, कसबे डीग्रज यांनी सोयाबीन पिकावर एकात्मिक रोग व किड या विषयावर सखोल मार्गदर्शन उपस्थित शेतक-यांना केले.

सौ. भोसले मॅडम, कृषि उपसंचालक, कृषि विभाग सांगली यांनी शासकिय कृषि योजनांची माहिती दिली. या मेळाव्यात भारतीय प्राकृतिक कृषि पद्धती, शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद, नैसर्गिक शेती, यांत्रिकीकरण, सर्वोत्तम कृषि पद्धती व नवीन कृषि तंत्रज्ञान ई. विषयी प्रदर्शनाचे आयोजन व तसेच पशुधन आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते.

शेतकरी मेळाव्यामध्ये महिला बचत गटांचा सहभाग लक्षणीय होता. या कार्यक्रमासाठी श्री. प्रकाश सूर्यवंशी, उपविभागीय कृषि अधिकारी मिरज, श्री. प्रदिप कदम, तालुका कृषि अधिकारी मिरज, डॉ. दिनार पाटील, प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, डॉ. विपिन वाले, श्री. शैलेश पाटील व कृषि विज्ञान केंद्राचे कर्मचारी तसेच श्री. आण्णासाहेब कोरे, श्री. सुभाष पाटील, श्री. विशाल चौगुले, श्री. निवासबापू पाटील, श्री. सुरेश गायकवाड व विविध गावातून प्रगतशील शेतक-यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. शैलेश पाटील यांनी केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.