Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कृषि पुरस्काराने जिल्ह्यातील 9 शेतकऱ्यांचा होणार सन्मान सोमवारी नाशिक येथे कृषि पुरस्कार प्रदान सोहळा

कृषि पुरस्काराने जिल्ह्यातील 9 शेतकऱ्यांचा होणार सन्मान सोमवारी नाशिक येथे कृषि पुरस्कार प्रदान सोहळा


सांगली दि. 29  :  कृषि क्षेत्रामध्ये् उल्ले खनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने विविध कृषि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. दि. 2 मे रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राज्यस्तरीय कृषि पुरस्कार वितरण सोहळ्यात सन 2017, 2018 आणि 2019 या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या सोहळ्यात 198 शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येणार असून यामध्ये सांगली जिल्ह्यातील 9 शेतकऱ्यांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी दिली.

पुरस्काराने सन्मानित करण्यात येणारे जिल्ह्यातील शेतकरी व पुरस्काराचे नाव पुढीलप्रमाणे. पुरस्कार वर्ष 2017 - सुरेश ज्ञानदेव चव्हाण (हातनूर, ता. तासगाव) - वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्का र, सुरेश आप्पासो कबाडे (करंदवाडी, ता. वाळवा) - वसंतराव नाईक शेतीनिष्ठ   शेतकरी पुरस्कािर (सर्वसाधारण गट), अमोल आनंदराव लकेसर (दुधारी, ता. वाळवा) - वसंतराव नाईक शेतीनिष्ठय  शेतकरी पुरस्काषर (सर्वसाधारण गट). पुरस्कार वर्ष 2018 - संजीव गणपतराव माने (आष्टा, ता. वाळवा) - डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्नस पुरस्कार, रवि अशोक पाटील (अंकलखोप ता. पलूस) - वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काार, काकासाहेब रावसाहेब सावंत (अंतराळ, ता. जत) - उद्यानपंडीत पुरस्काकर. पुरस्कार वर्ष 2019 - सुनील आनंदराव माने (आष्टा, ता. वाळवा) - वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काडर, प्रशांत श्रीधर लटपटे (सावळवाडी, ता. मिरज) - वसंतराव नाईक शेतीनिष्ठि  शेतकरी पुरस्काणर (सर्वसाधारण गट), सचिन तानाजी येवले (पडवळवाडी ता. वाळवा) - कृषिभूषण (सेंद्रिय शेती).

हा कार्यक्रम कृषि विभागाच्या युट्युब चॅनल www.youtube.com/c/Agriculture DepartmentGoM वर लाईव्ह प्रसारित केला जाणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. वेताळ यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.