सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण करणार स्व खर्चाने 75 ठिकाणी देशभक्तीपर गीतांचे कार्यक्रम : पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ : पालकमंत्री महोदयाकडून उपक्रमाचे कौतुक
सांगली: शासनाच्या आझादी का अमृत महोत्सवअंतर्गत सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण हे स्वखर्चाने 75 ठिकाणी देशभक्तीपर गीतांचे कार्यक्रम करणार आहेत. या मोहिमेचा शुभारंभ आज पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी दीपक चव्हाण यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी कोरोनाच्या पहिल्या दुसऱ्या लाटेत आपल्या शोलेस्टाईल दुचाकीवरून जवळजवळ 10000 km चा प्रवास करीत 350 गावात सलग 555 दिवस स्वखर्चाने पोहचून कोरोनाबाबत जनजागृती केली. याचबरोबर सांगलीपासून राधानगरी पर्यंतच्या तब्बल 40 कोविड सेंटरमध्ये स्व खर्चाने जाऊन रुग्णांचे गाण्यातून मनोरंजन करीत आधार देण्याचं काम केल्यानंतर आता दीपक चव्हाण यांनी देशसेवेसाठी नवा उपक्रम हाती घेतला आहे. शासनाकडून भारत देशाचा अमृत महोत्सव देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. याचेच औचित्य साधत दीपक चव्हाण यांनी स्व खर्चाने आपल्या शोलेस्टाईल दुचाकीवरून 75 ठिकाणी देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमातून देशभक्तीचा जागर करणार आहेत.
देशभक्तीपर गीतातून सांगली जिल्ह्यात देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षांचा आनंदोत्सव साजरा करणार आहेत. सोमवारी या अभियानाचा जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी दीपक चव्हाण यांच्या या उपक्रमाचे नामदार जयंत पाटील यांनी कौतुक केले. यावेळी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, नियोजन समिती सदस्य संजय बजाज, पै.राहुलदादा पवार, माजी नगरसेवक शेखर माने आदी उपस्थित होते. या अभियानाचा शुभारंभ झाल्यानंतर आता सांगली मिरज जयसिंगपूर येथील शाळा महाविद्यालये
सार्वजनिक ठिकाणे, मनपाची दवाखाने
बसस्थानक, रेल्वे स्टेशन
बाजाराची ठिकाणे
यासह अनेक गावात पोहचून 75 ठिकाणी* गाण्यातून करणार देशाच्या
अमृतमहोत्सवी वर्षांबाबत दीपक चव्हाण यांनी जनजागृती केली. आपल्या शहरात, भागात किंवा गावात देशभक्तीपर गाण्यांच्या कार्यक्रमासाठी आयोजित करण्यासाठी
7385673100 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.