Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात सरकारी अधिकाऱ्यांचे रॅकेट उघड, 44 जण निलंबित

पुण्यात सरकारी अधिकाऱ्यांचे रॅकेट उघड, 44 जण निलंबित


पुणे : शहरात अनधिकृत इमारतींमधील सदनिका तसेच बेकायदा प्लॉटिंगची दस्त नोंदणी केल्याप्रकरणी शासनाने नोंदणी व मुद्रांक विभागातील 44 अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करुन घरचा रस्ता दाखविला आहे.

यामध्ये 11 दुय्यम निबंधकांचा समावेश आहे. नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई होण्याची इतिहासातील पहिलीच वेळ आहे. यामुळे नोंदणी व मुद्रांक विभागातील बेबंदशाहीला लगाम बसणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. शहरात रेरा कायद्याचे उल्लंघन करून दस्त नोंदणी झाल्याबाबत तक्रारी राज्य शासनाकडे करण्यात आल्या होत्या.

त्यानुसार शहरातील 27 दुय्यम निबंधक कार्यालयांमधील मागील तीन वर्षांत नोंदविलेल्या सुमारे एक लाख दस्तांची तपासणी सुरू करण्यात आली होती. तपासणी पथक हे राज्य शासनाने नेमले होते. या तपासणीमध्ये काही दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये नियमबाह्यपणे दस्तांची नोंदणी झाल्याचे दिसून आले आहे. रेरा कायद्याचे उल्लंघन करून तब्बल 10 ह 561 दस्तनोंदणी केल्याचे आढळून आले आहे. हा तपासणी अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्यानंतर शासनाने दोषी आढळणाऱ्या 44 अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश - नोंदणी व मुद्रांक विभागाला दिले. त्यानुसार नोंदणी महानिरीक्षक यांनी ही कारवाई केली आहे.

राज्य शासनाने अनधिकृत बांधकामांची दस्त नोंदणी करू नये, असे आदेश दिले आहेत. तसेच संबधित बांधकाम प्रकल्पाची नोंदणी रेरा प्राधिकरणाकडे करून रेरा क्रमांक दस्तामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा स्पष्ट सूचना असतानाही दुय्यम निबंधकांनी बेजाबदारपणे रेरा क्रमांक नसलेल्या बांधकाम प्रकल्पांमधील दस्तांची नोंदणी केली. जमिनीचे तुकडे पाडून त्याची विक्री करण्यास मनाई असतानासुद्धा एक-एक गुंठ्यांची दस्तनोंदणी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. दुय्यम निबंधकांचे हे कारनामे खुद्द महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याने त्यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर निलंबनाची कारवाई करणाचे आदेश दिले.

अशी झाली तपासणी

दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदविण्यात आलेल्या 11 अधिकाऱ्यांचा समावेश 400 पेक्षा जास्त दस्त बेकायदेशीरपणे नोंदविल्या प्रकरणी 11 अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली आहे. तर 100 ते 350 पर्यंत दस्त नोंदविणाऱ्या 9 अधिकाऱ्यांची बदली करून चौकशी करण्यात येत आहे. 11 ते 99 पर्यंत दस्त नोंदविणाऱ्या 9 जणांची विभागीय चौकशी, तर 2 ते 10 दस्त नोंदविणाऱ्यांकडून खुलासा मागवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

निबंधक- लिपिकांची साखळी

शहरातील हवेली क्रमांक 27 मध्ये कार्यरत असणाऱ्या एका दुय्यम निबंधकाने तब्बल 1 हजार 286 दस्त बेकायदेशीरपणे नोंदविले आहे. दुय्यम निबंधकाचा तात्पुरता पदभार असणाऱ्या वरिष्ठ लिपिकाने आपल्या साहेबांच्या पावलावर पाऊल टाकत 810 दस्त नोंदविले. तर दुसऱ्या वरिष्ठ लिपिकाने 804 दस्त बेकायदेशीरपणे नोंदविले. दुय्यम निबंधकांचे हे कारनामे सुरु असताना वरिष्ठ लिपीक आणि कनिष्ठ लिपिकाने सुद्धा रेरा कायद्याचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर दस्त नोंदविल्याचे तपासणीत आढळले आहे. या कनि लिपिकाने तब्बल 652 दस्त नोंदविले आहेत. 20 पेक्षा कायद्याचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर दस्त नोंदविल्याचे तपासणीत आढळले आहे. या कनिष्ठ लिपिकाने तब्बल 652 दस्त नोंदविले आहेत. 20 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांनी 100 ते बाराशे पर्यंत नियमांचे उल्लंघन करून दस्त नोंदणी केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.