बिअर शॉपीच्या परवान्यासाठी 3 लाखाच्या लाचेची मागणी, उत्पादन शुल्कचे तीन अधिकारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
सातारा : बियर शॉपीचा - परवान्याचे प्रकरण वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तीन अधिकाऱ्यांवर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर तिघांना अटक केली आहे. निरीक्षक सतीश विठ्ठलराव काळभोर (वय-56), दुय्यम निरीक्षक दत्तात्रय विठोबा माकर (वय-56), जवान नितीन नामदेव इंदलकर (वय-36) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत 47 वर्षाच्या व्यक्तीने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांना नवीन बियर शॉपी सुरु करायची होती. यासाठी ते सातारा उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांच्याकडे दत्तात्रय माकर आणि नितीन इंदलकर याने परवान्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यासाठी तीन लाखाची लाच मागितली. तर निरीक्षक सतीश काळभोर यांनी तक्रारदाराला लाच रक्कम मागणीस प्रोत्साहन दिले. हा सर्व प्रकार 14 मार्च 2022 रोजी घडला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.