Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाडिबीटी प्रणालीवर अर्ज भरण्यास 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ

 महाडिबीटी प्रणालीवर अर्ज भरण्यास 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ


सांगली, दि. 5,  : अनुसूचित जाती, विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील नवीन शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी नवीन व नुतनीकरण अर्जदारांसाठी तसेच सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील प्रलंबित नुतनीकरण अर्जदारांसाठी शिष्यवृत्ती, फ्रीशिप, आरएसएमएस, निर्वाह भत्ता या योजनेकरीता अर्ज भरण्याकामी महाडिबीटी प्रणालीवर प्रक्रिया सुरू करणेत आली आहे. अर्ज भरण्यासाठी दि. 30 एप्रिल 2022 पर्यंत अंतीम मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी या योजनेकरीता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे www.mahadbtmahait.gov.in या  संकेत स्थळावरुन अर्ज भरावेत. सांगली जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित सर्व विद्यालय/ महाविद्यालय यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.

आजअखेर महाविद्यालयांनी या विषयी लक्ष न घातल्याने या जिल्ह्याअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहत आहेत. तरी वरील अंतिम दिनांकापर्यंत सर्व योजनांचे अर्ज भरुन घ्यावेत. भविष्यात अंतिम दिनांकानंतर मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्याबाबत किंवा अशा प्रकारे कोणतीही तक्रार निर्माण झाल्यास यास  विद्यालय/ महाविद्यालयांना सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.