Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नरसंहारानंतरही खोरे न सोडणाऱ्या काश्मिरी पंडितांवर 30 वर्षांनी हल्ला; पंडितांच्या पुनर्वसनात अडथळ्याचा प्रयत्न!!

नरसंहारानंतरही खोरे न सोडणाऱ्या काश्मिरी पंडितांवर 30 वर्षांनी हल्ला; पंडितांच्या पुनर्वसनात अडथळ्याचा प्रयत्न!!


श्रीनगर : काश्मीर मध्ये हिंदूंच्या पुनर्वसनात अडथळा आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. काश्मीरमध्ये मेडिकल स्टोअर चालवणारे सोनू कुमार बलजी यांनी काश्मिरी पंडितांच्या विस्थापना वेळीही खोरे सोडले नव्हते.

बलजी गेल्या 30 वर्षांपासून काश्मीरमध्येच राहतात. त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. जखमी अवस्थेत सोनू कुमार बलजी यांना गंभीर अवस्थेत श्रीनगर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आणि परिसराची नाकाबंदी करून शोध मोहीम सुरू केली आहे.24 तासांत 7 जणांवर गोळीबार केला

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील चित्रागाममध्ये सोमवारी, ४ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी काश्मिरी पंडित सोनू कुमार बलजी यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात बलजी यांना तीन गोळ्या लागल्या. याशिवाय खोऱ्यात दहशतवाद्यांनी गेल्या 24 तासांत 7 जणांवर गोळीबार केला आहे.

यात पुलवामामध्ये 4 बाहेरील मजूर, श्रीनगरमध्ये 2 सीआरपीएफचे जवान आणि आता शोपियानमध्ये एक काश्मिरी पंडित जखमी झाले आहेत. काश्मिरी पंडित खोऱ्यात परत येऊ नयेत, यासाठी पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांनी यासंदर्भात बोलताना म्हटले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.