ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधांसाठी 190 कामांसाठी 24 कोटी 5 लाखाचा निधी
सांगली, दि. 7, : ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाने बांधकाम विभागासाठी सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील 190 कामांसाठी 24 कोटी 5 लाखाचा निधी मंजूर केला आहे. या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ही सर्व कामे लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सुचविलेली असून ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
सदरची कामे सन 2021-22 या आर्थिक वर्षातील असून ती 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. या कामांमध्ये विविध ग्रामीण क्षेत्रातील गावांत सभागृह बांधणे, पेव्हींग ब्लॉक बसविणे, अंतर्गत रस्ते सुधारणेंतर्गत डांबरीकरण, खडीकरण, मुरमीकरण व काँक्रीटीकरण करणे, जोड रस्ते सुधारणे, ग्राम सचिवालय बांधणी, संरक्षक भिंत बांधणे, व्यायाम शाळा बांधणे, धार्मिक स्थळांचा विकास, सांस्कृतिक भवन बांधणे, स्मशान भूमी बांधकाम व सुशोभिकरण आदि कामांचा समावेश आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.