Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इकडं केजरीवाल गुजरातमधून परतले अन् तिकडं भाजपत सामील झाले आपचे 150 नेते

 इकडं केजरीवाल गुजरातमधून परतले अन् तिकडं भाजपत सामील झाले आपचे 150 नेते


नवी दिल्ली : गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील सुमारे 150 नेते आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचे वृत्त आहे.

एवढेच नाही, तर काँग्रेसलाही मोठा फटका बसला आहे. काँग्रेसच्या अनेक कार्यकरत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाचे म्हणजे, राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एक दिवस आधीच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावरून परतले आहेत. असे असतानाच एवढ्या मोठ्या संख्येने आप नेत्यांनी पक्ष राम-राम ठोकला आहे. मार्चमध्येच 'आप'च्या शेकडो नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

गुजरात भाजपचे सरचिटणीस प्रदीपसिंह वाघेला म्हणाले, "दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे मुख्यमंत्री घरीही पोहोचले नसतील किंवा त्यांचे जेवणही झाले नसेल आणि त्यांच्या पक्षातील अनेक लोक भाजपमध्ये सामील झाले. यावरून ते गुजरातच्या जनतेला मूर्ख बनवू शकत नाहीत, हे स्पष्ट होते. त्यांच्या गुजरात दौऱ्याला काही अर्थ नाही. भाजपसोबत गुजरातच्या जनतेचा आशीर्वाद काय आहे. पंजाबमध्ये आप सरकारच्या अवघ्या पाच दिवसांत शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, असेही ते म्हणाले."

नव्या नेत्यांचे पक्षात स्वागत करताना वाघेला म्हणाले, 'आज आपण 'आप' आणि काँग्रेस सोडून भाजपत आला आहात. ते म्हणतील, की तुमचा काही उपयोग नव्हता. पण, मी सांगू इच्छितो की गुजरातच्या विकासासाठी आपण अत्यंत महत्त्वाचे आहात आणि भाजपमध्ये आपले स्वागत आहे. गुजरातमध्ये प्रदीर्घ काळ भाजपचे सरकार आहे. कारण जनतेचा आमच्यावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे.'

महत्वाचे म्हणजे, दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आलेले केजरीवाल आणि मान रविवारी गुजरातमधून परतले आणि सोमवारीच आपला सोडचिठ्ठी देत शेकडो कार्यकर्ते गांधीनगरच्या कमलम येथील कार्यालयात भाजपमध्ये सामील झाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.