Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महानगरपालिका शाळांतील मुलांना आता नव्या शैक्षणिक वर्षापासून मोफत डान्स प्रशिक्षण : 15 डान्स अकॅडमीची तयारी : आयुक्त नितीन कापडणीस यांची माहिती

महानगरपालिका शाळांतील मुलांना आता नव्या शैक्षणिक वर्षापासून मोफत डान्स प्रशिक्षण : 15 डान्स अकॅडमीची तयारी : आयुक्त नितीन कापडणीस यांची माहिती


सांगली: महानगरपालिका क्षेत्रातील सर्व डान्स ॲकॅडमी आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका शाळांतील मुलांना आता नव्या शैक्षणिक वर्षापासून मोफत डान्स प्रशिक्षण दिले जाणार आहे , अशी माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

   याबाबत बोलताना आयुक्त कापडणीस म्हणाले की, महापालिका शाळाना सर्व दृष्ट्या सक्षम करण्याबरोबर विद्यार्थ्यांना सर्व सुविधा देण्याचा आमचा माणस आहे. यासाठी शिक्षण विभागासाठी यंदाच्या बजेटमध्येही 5 कोटींची तरतूद करून शिक्षण विभागाच्या सक्षमीकरणाचा निर्धार केला आहे. महापालिका शाळांकडे विद्यार्थ्याची संख्या वाढावी यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये अनेक शाळा या मॉडेल बनवून त्यामध्ये विद्यार्थ्यांना मॉडेल स्कुलच्या सर्व सुविधा दिल्या आहेत. याच पद्धतीने इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य मोफत देण्याचा निर्णयही घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून मनपा शाळांमध्ये मोफत डान्स प्रशिक्षण दिले जाणार आहे.

यासाठी शहरातील १५ हून अधिक डान्स ॲकॅडमीज या उपक्रमात सक्रीय सहभागी होणार आहेत तसेच डान्स ॲकॅडमींनाही सर्व प्रकारची मदत मनपा उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश महापालिका शाळेत निश्चित करावा असे आवाहनही आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

मनपा शाळांना डान्स शिकवण्यासाठी पुढे आलेल्या डान्स अकॅडमी आक्षय कुमारमठ स्टायलर डान्स अकॅडमी, सांगली

अजय शिंदे ( अजय शिंदे डान्स अकॅडमी,सांगली)

सुमित साळुखे (सुमित डान्स अकॅडमी,सांगली)

संजय काकडे (संजय काकडे डान्स अकॅडमी, सांगली)

ओम तुपे डान्स अकॅडमी

ओमकार रोकडे (ओमकार रोकडे डान्स अकॅडमी)

धनश्री आपटे (धनश्री आपटे डान्स अकॅडमी)

प्रदीप सातपुते डान्स अकॅडमी

रुपाली जाधव डान्स अकॅडमी

शिवराज एमएम (शिवराज डान्स अकॅडमी)

सुशांत डान्सर (सुशांत डान्स अकॅडमी)

मयूर शिंदे (डान्स वन अकॅडमी)


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.