कॅन्सर केअर व मल्टीस्पेशालिटी कामाचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन : सांगलीत उभारणार 100 बेडचे कॅन्सर केअर सेंटर
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आणि जीवन ज्योत कॅन्सर केअर अँड रिलीफ ट्रस्ट कडून सांगलीत 10 कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या पहिल्या कॅन्सर केअर व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणी कामाचे भूमिपूजन पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
महापालिकेच्या शाळा क्रमांक 6 च्या आवारात जीवन ज्योतकडून सातमजली कॅन्सर केअर व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाणार आहे. यामध्ये कॅन्सर पीडित व्यक्तीसाठी चॅरिटी दरामध्ये सर्व सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या प्रयत्नाने साकारत असणाऱ्या जीवन ज्योत ट्रस्टच्या कॅन्सर केअर सेंटरच्या इमारत कामाचा भूमिपूजन रविवारी पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी करत ट्रस्टकडून उभारल्या जाणाऱ्या कॅन्सर केअर व मल्टीस्पेशियालीटी उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, नियोजन समिती सदस्य संजय बजाज, जीवन ज्योत कॅन्सर केअर अँड रिलीफ ट्रस्टचे संस्थापक हरकचंद सावळा, सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता सुधीर ननंदकर , डॉ रुपेश पाटील, मनपाचे उपायुक्त राहुल रोकडे, चंद्रकांत आडके, जीवन ज्योतच्या ट्रस्टी निर्मला सावळा, सांगली प्रतिनिधी मीना मारू, शमिका नाडकर्णी , समाजकल्याण सभापती नगरसेवक विष्णु माने, नगरसेविका गीता सुतार, आरोग्यधिकारी डॉ सुनील आंबोळे, डॉ रवींद्र ताटे, डॉ वैभव पाटील, शेखर माने, सागर घोडके, धनपाल खोत , आर्किटेक्ट प्रमोद पारीख , अग्निशमन अधिकारी विजय पवार, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर अग्निशमन कर्मचारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात आयुक्त नितीन कापडणीस यांचा विशेष सेवा सहकार्य याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी जीवनज्योत ट्रस्ट कडून सांगलीसाठी उभारले जाणारे हॉस्पिटल आणि त्यासाठी केल्या जाणाऱ्या गुंतवणुक याबद्दल विशेष आभार मानले. हे रुग्णालय सुरू झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल नंतर याच ठिकाणी सवलतीच्या दरात नागरिकांना सेवा सुविधा मिळतील अशी खात्रीही पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केली. या कॅन्सर केअर व मल्टीस्पेशियालीटी सेंटरमुळे आता सांगलीत कॅन्सर पीडितांना उपचाराची सोय मिळणार असल्याने ही सांगलीच्या दृष्टीने एक चांगली बाब आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी तर आभार उपायुक्त चंद्रकांत आडके यांनी मानले, सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.