Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मंगळवेढ्यात प्रियकराच्या मदतीने केला शिक्षक पतीचा खून, पत्नीने रचला आत्महत्येचा बनाव

 मंगळवेढ्यात प्रियकराच्या मदतीने केला शिक्षक पतीचा खून, पत्नीने रचला आत्महत्येचा बनाव


आपला पती आपल्या अफेअरमध्ये अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पत्नीनेच त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या प्रियकराला सोबत घेत पतीचा खून करणाऱ्या महिलेला मंगळवेढा पोलिसांनी अटक केली आहे.आपला पती हा आपल्या प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या रागातून महिलेनं त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी आपल्या प्रियकराची मदत घेत पतीवर खुनी हल्ला केला. त्यात पती ठार झाल्यावर तिने बनाव रचला आणि पतीने आत्महत्या केली, असं दाखवलं. मात्र अखेर तिचं बिंग फुटलंच. या घटनेने तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली

या प्रकरणात पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवेढा तालुक्यातील शिवनगी येथील सत्यवान मच्छिंद्र कांबळे उमदी येथील खाजगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. यांच्या पत्नीचे सांगली येथील प्रशांत अशोक पवार (वय 32 जुना मिरज कुपवाड रोड सांगली) याच्याबरोबर अनैतिक संबंध होते.

त्या संबंधातून मयताच्या पत्नीच्या सांगण्यावरून शाहरुख रफिक शेख (वय 24 पालवी हॉटेल जवळ सध्या रा.गारपिर चौक सांगली) अजय परशुराम घाडगे वय 24 रा. समडोळी ता. मिरज यानी काल रात्री 1.30 वा शिक्षक सत्यवान कांबळे त्याच्या घरी झोपलेला असताना त्याचा दोरीने गळा आवळून खून केला व याबाबत कोणाला संशय येऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करून त्याच्याच घरातील पंख्याला दोरीला अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला. दरम्यान त्याच्या पत्नीने पहाटे उठून पाहिले असता आपला पती दिसला नाही व त्याने गळफास घेतल्याचे दिसून आल्याचे सांगितले.

सांगलीच्या गुन्हे अन्वेषण पथक एका दुहेरी खुनाच्या अनुषंगाने माहिती काढीत असताना यातील तीन संशयित आरोपी हे सांगली ते मिरज रोड वर तानंग फाटा येथे संशयित रित्या फिरत असताना आढळून आले. त्यांनी उमदी परिसरात गंभीर स्वरूपाचा गुन्हा केल्याच्या माहीत वरून पोलिसांनी सापळा लावून या तिघांना ताब्यात घेतले. त्यातील एकाने केलेल्या खुनाची माहिती यावेळी पोलिसांना दिली.

दरम्यान त्याच्या पत्नीने पहाटे उठून पाहिले असता आपला पती दिसला नाही व त्याने गळफास घेतल्याचे दिसून आल्याचे सांगितले होते. शिक्षक सत्यवान कांबळे त्याच्या घरी झोपलेला असताना त्याचा जागी दोरीने गळा आवळून खून केला व याबाबत कोणाला संशय येऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करून त्याच्याच घरातील पंख्याला दोरीला अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी त्याची पत्नी इंदिरा कांबळे व तिच्या प्रियकरासह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

सहज चौकशी केली अन् खुनाला वाचा फुटली

* रात्री खून केल्यानंतर प्रशांत व त्याचे दोन मित्र सांगलीकडे पळून गेले. बुधवारी दुपारी सांगलीच्या तानंग फाट्यावर हे तिघे थांबले. दरम्यान, तेथून जाणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला या तिघांची हालचाल संशयास्पद वाटली. त्याने सहज चौकशी केली असता हे तिघे गडबडले. बहुदा आपला गुन्हा पोलिसांना समजला असावा, असे वाटून प्रशांतचा मित्र अजय घाबरुन गेला. समोरच्या पोलिसाला सारे माहित झाले असावे, या समजुतीतून त्याने घडाघडा सत्य कथन केले.

* घटनेचे गांभीर्य ओळखून बाकीची टीमही तत्काळ फाट्यावर आली. पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या पथकातील सपोनि प्रशांत निशाणदार , दिलीप ढेरे, संदीप पाटील , संतोष गळवे, संकेत मगदुम, संदीप गुरव, राजू शिरोळकर, सचिन धोत्रे, सागर ढिंगरे , अरुण औताडे , राजू मुळे, मच्छिद्र बडे , सुरेखा कुंभार यांनी कसून चौकशी केली. या तिघांनी खुनाची कबुली देताच सांगली पोलिसांनी तत्काळ मंगळवेढा पोलिसांर्शी संपर्क साधला.

* दरम्यान, काल रात्री सत्यवानचा मृतदेह पोस्टमा ग्रामीण रुग्णालयात आणला होता. सत्यवानचा मृत्यू आत्महत्येतून नसून, पत्नीनेच प्रियकराकरवी खून केला आहे, हे समजताच नातेवाईकांसह अख्खा गाव हादरला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.