Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

यांनी लुटले ६० हजार करोड ! सरकारही करू शकत नाही वसुली !आता माजी केंद्रीय अर्थमंत्र्यांचाही हात असल्याचा संशय !

यांनी लुटले ६० हजार करोड ! सरकारही करू शकत नाही वसुली !आता माजी केंद्रीय अर्थमंत्र्यांचाही हात असल्याचा संशय !


मुंबई : नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ( एनएसई ) वर जवळपास पाच वर्षे दररोज दरोडा पडत होता.यातून लुटलेल्या रकमेचा जो अंदाज आहे, तो ६० हजार कोटींवर जाऊन पोचला आहे.‘ हिमालयीन योगी ‘ च्या आदेशानूसार चालणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्स्चेंजची गुढ आणि चित्तथरारक मालिका आपण चालू ठेवली आहे. आता या मालिकेचा आणखी एक नवा एपीसोड पुढे येतो आहे.

या मालिकेत यापूर्वी काय घडले ते वाचायचे असेल तर ते या लिंकवर मिळेल.या एपिसोडमध्ये आता ही मालिका आणखी रंगतदार झाली आहे. आता यामध्ये आणखी काही नवीन पात्रे प्रवेश करत आहेत. आता पहा या नव्या एपिसोडमध्ये काय नवीन माहिती मिळते आहे.

हिमालयीन योगीपासून सुरु झालेली ही कथा आता चित्रा रामकृष्णा आणि आनंद सुब्रम्हण्यम यांचे कसे संबंध होते याची माहिती देण्यापर्यंत आली होती. आता पुढे ...

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये चित्रा रामकृष्णा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आनंद सु्ब्रम्हण्यम प्रमुख सल्लागार आणि चीफ ऑपरेटींग ऑफीसर म्हणून काम करत असतानाच्या काळात झालेल्या घोटाळ्याची नेमकी रक्कम किती याचा अंदाज आता काढला जात आहे. हा अंदाज जवळपास ६० हजार कोटी रुपये इतका आहे.

आजपर्यंत कोणतीही माध्यमे या घोटाळ्यावर फार लक्ष देत नव्हती. परंतू यापुढे तुम्हाला सगळी माध्यमे या घोटाळ्यावर जोराजोरात बोलताना दिसतील. कारण आता या घोटाळ्यात माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे नाव पुढे येते आहे. सध्याची बहुतेक माध्यमे ही भाजपाला अनुकुल भुमिका घेताना दिसत असतात. या घोटाळ्याचा काळ हा २०१३ ते २०१६ असा आहे. यातील बराचसा काळ हा भाजपा राजवटीचा असल्याने या घोटाळ्याकडे सर्व माध्यमांनी दुर्लक्ष केले असावे. मात्र आता मात्र कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्याचे नाव यात येऊ लागल्याने सर्व माध्यमे हिरीरीने या घोटाळ्याकडे लक्ष देतील. आता या घोटाळ्याचा काळ हळूहळू मागे नेण्याचा प्रयत्न होतो आहे. अर्थातच हा घोटाळा भाजपाची सत्ता येण्यापूर्वीचा आहे, आणि या सरकारने तो पुढे आणला, अशा पद्धतीने मांडणी करण्यााचा प्रयत्न होतो आहे.

आता भरदिवसा जवळपास ६०० दिवस दररोज १ कोटी रुपये या घोटाळ्यातून मिळवण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. आता हा घोटाळा कसा करण्यात आला त्याच्या सूरस कथा पुढे येत आहेत. साधारणपणे काही विशिष्ठ विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका अगोदर देऊन त्यांना जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी मदत करण्यासारखा हा प्रकार आहे.

यामध्ये नॅशनल स्टॉक एक्स्चेंज सुरु होण्यापूर्वी ३ तास सिंगापूर स्टॉक एक्स्चेंज सुरु होत असे. सिंगापूर स्टॉक एक्स्चेंजमधील शेअर्सच्या खरेदीविक्रीची अंदाज घेऊन भारतातील काही ब्रोकर्सना त्याची अगोदरच माहिती दिली जात असे. जसे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज सुरु होत असे, हे ब्रोकर्स त्यांची खरेदी विक्री सर्वात अगोदर करत असत. याखेरीज नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या बॅक अप सर्व्हरवरुन काही ब्रोकर कनेक्ट होत असत. या सर्व्हरवर सगळे ब्रोकर येत नसल्याने या ठराविक ब्रोकर्सना आपली खरेदी विक्री इतरांपेक्षा लवकर करता येत असे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे एकापेक्षा जास्त सर्व्हर उपयोगात येत असत. यापैकी काही सर्व्हरचा उपयोग ठराविक ब्रोकर्सनाच करता येई. त्यामुळेही त्यांना आपल्या इंन्ट्रीज सगळ्यांच्या आधी करता येत असत.

अशा सगळ्या खरेदी विक्रीतून दररोज जवळपास १ कोटी रुपयांची कमाई केली जात असल्याचा अंदाज आहे. पाच वर्षातील सुट्ट्या वगळता ट्रेडींगचे दिवस ६०० होतात. या ६०० दिवसात प्रत्येक दिवशी १ कोटी याप्रमाणे किमान ६० हजार कोटी रुपये काही ब्रोकर्सने मिळविले असल्याचा अंदाज आहे.

अगदी दिवसाढवळ्या, राजरोसपणे ही लूट होत होती. यावर कोणत्याही यंत्रणेने लक्ष दिले नाही. चित्रा रामकृष्णा, आनंद सु्ब्रम्हण्यम ही केवळ प्यादी होती. यामधील खरे सूत्रधार वेगळेच होते. आता याचे धागेदोरे मागील केंद्र सरकारमधील अर्थमंत्री पी चिदंमबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती यांच्यापर्यंत जाऊन पोचत आहेत.

मात्र असे जरी असले तरी या घोटाळ्याबाबत कुणाला शिक्षा होईल किंवा कुणाकडून वसुली होईल याची फारशी आशा नाही. यात वापरलेला लॅपलॉट अगोदरच तोडून टाकलेला आहे. इतर कोणतेही पुरावे शिल्लक ठेवलेले नाहीत. त्यामुळे आता इतक्या वर्षानंतर सिद्ध करण्यासारखे काही राहिलेलेच नाही. तसेच यातील तपास यंत्रणा असलेल्या सेबीलाही यात फार चौकशी करावे असे वाटताना दिसत नाही.

त्यामुळे भरदिवसा दरोडा घालणारे हे दरोडेखोर आपल्या डोळ्यादेखत खुलेआम फिरताना आपल्याला पहावे लागणार आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.