Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिका क्षेत्रातील अनाधिकृत पथविक्रेत्यांना तात्पुरते प्रमाणपत्र द्यायला सुरवात

महापालिका क्षेत्रातील अनाधिकृत पथविक्रेत्यांना तात्पुरते प्रमाणपत्र द्यायला सुरवात : मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार प्रमाणपत्र देण्यास सुरुवात : पहिल्याच दिवशी 15 विक्रेत्याना ऑनस्पॉट प्रमाणपत्र 


सांगली : महापालिका क्षेत्रात अदयापही अनेक फेरीवाले महापालिकेकडे नोंदणी न करता अनअधिकृतपणे व्यवसाय करनाऱ्या फेरीवाल्याना महापालिकेकडून तीन महिने करीता तात्पुरते स्वरुपाचे फेरीवाला परवाना प्रमाणपत्र देण्यास सुरवात झाली आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त चंद्रकांत आडके आणि पथकाकडून प्रमाणपत्र दिले जात आहे.

पहिल्याच दिवशी 15 पथविक्रेत्याना ऑन स्पॉट प्रमाणपत्रे देण्यात आली. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत शहर फेरीवाला धोरणानुसार महापालिका क्षेत्रातील फेरीवाले यांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात आले आहे. आत्तापर्यंत २६१२ फेरीवाल्यांनी महापालिकेकडे कागदपत्रे जमा केली आहेत पैकी १२४६ फेरीवाले यांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आलेली आहेत. महापालिका क्षेत्रात अदयापही अनेक फेरीवाले महापालिकेकडे नोंदणी न करता अनअधिकृतपणे व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ज्या फेरीवाल्यांचे  सर्वेक्षण झालेले नाही तसेच ज्यांना सर्वेक्षण होऊनही अदयाप ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळालेले नाही अशा फेरीवाले यांना तीन महिने करीता महापालिकेडून तात्पुरते स्वरुपाचे फेरीवाला परवाना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून विशेष पथके तयार करणेत आलेली असून त्यांचे मार्फत महापालिका क्षेत्रात व्यवसाय करणारे फेरीवाला यांना ऑन दी स्पॉट व्यवसायाच्या ठिकाणावर परिरक्षण शुल्क व उपयोगिता शुल्क भरुन घेवून तात्पुरते प्रमाणपत्र  देण्यात येत आहे. हे प्रमाणपत्र देण्याच्या मोहिमेस शुक्रवारपासून सुरवात झाली आहे. 

उपायुक्त चंद्रकांत आडके , सहायक आयुक्त नितीन शिंदे, राष्ट्रीय उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापक ज्योती सरवदे आणि मालमत्ता विभाग यांच्या पथकाने ऑन स्पॉट तात्पुरते प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आज प्रभाग समिती 1 अंतर्गत माधवनगर जकात नाका ते कारखाना मार्गावरील 15 फेरीवाल्याना ऑन स्पॉट तात्पुरते प्रमाणपत्र देण्यात आले. ज्या फेरीवाल्यांकडे महापालिकेचा परवाना नाही अशा फेरीवाल्यांनी तात्पुरते प्रमाणपत्र घ्यावे असे आवाहन मनपा उपायुक्त चंद्रकांत आडके यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.