तुमच्या आधार कार्डचा गैरवापर तर होत नाही ना? 'या' सोप्या मार्गाने मोबाईलवरून हिस्ट्री तपासा !
पुणे : सरकारी काम करायचं असो वा निमसरकारी काम, त्यासाठी अनेक प्रकारच्या कागदपत्रांची गरज असते. जसे- ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, बँकिंग माहिती इ. पण असा एक कागदपत्र आहे, ज्याच्या नसण्याने किंवा गहाळ होण्याने आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि ते कागदपत्र म्हणजे आपले आधार कार्ड.
हे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे भारतातील प्रत्येक नागरिकाला जारी केले जाते, ज्याचा 12 अंकी आयडी असतो. मात्र आधार कार्डची गरज मोठी असल्याने फसवणूक करणारेही चांगलेच सक्रिय झाले आहेत जे लोकांच्या आधार कार्डचा गैरवापर करण्यात तरबेज असतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला हे देखील जाणून घ्यायचे असेल की तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे, तर तुम्ही त्याचा इतिहास जाणून घेऊ शकता. चला तर मग आम्ही तुम्हाला आधार कार्डची हिस्ट्री तपासण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगतो.
आधार कार्डचा इतिहास अशा प्रकारे तपासा -
१. तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही त्याचा इतिहास (हिस्ट्री) तपासू शकता. यासाठी तुम्हाला प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in ला भेट द्यावी लागेल.
२. वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला 'माय आधार' हा पर्याय दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 'आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री' हा पर्याय दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
३. त्यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल आणि त्यानंतर स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड देखील भरा. आता 'ओटीपी व्हेरिफिकेशन' पर्यायावर क्लिक करा.
४. आता तुम्हाला त्या मोबाईल नंबरवर वन टाईम पासवर्ड म्हणजेच ओटीपी मिळेल, जो तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे. हा ओटीपी देखील इथे टाका.
५. शेवटी तुमच्या समोर एक टॅब उघडेल. येथे तुम्हाला ती तारीख टाकावी लागेल ज्या दिवशीची हिस्ट्री तुम्हाला पाहायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे. तुम्ही हे रेकॉर्ड डाउनलोड देखील करू शकता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.