आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दुसर्याच दिवशी माजी नगरसेविका ज्योती आदाटे यांच्या
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दुसर्याच दिवशी माजी नगरसेविका ज्योती आदाटे यांच्या ( आईची आई) तानुबाई रामचंद्र चव्हाण या त्यांच्या आज्जी चे 108 व्या वर्षी निधन झाले मुलाबाळांचे गोकुळ असताना माऊलीचा प्राण मुलीच्या घरी गेला तिच्या आयुष्याची रम्य संध्याकाळ तिची मुलगी,नातं आणि पणतु यांच्या सहवासात गेली अचानक वृद्धापकाळाने ती माऊली कायमची निघुन गेली.
त्यावेळी हजारो वर्षाची रुढी परंपरा झुगारून देऊन सांगलीतील माजी नगरसेविका ज्योती आदाटे आणि त्यांच्या सहकाऱी प्रियांका तुपलोंडे,राणी कदम, आणि सुजाता दळवी या चौघींनी मिळुन या माऊलीला खांदा दिला बर्याच नातेवाईकांनी विरोध केला परंतु कोणाच्याही विरोधाला न जुमानता या चौघींनी खांदा तर दिलाच आणि शिकाळ त्यांच्या मातोश्रींनी म्हणजेच त्या माऊलीची लेक प्रभावती आदाटे यांनी धरुन मागासलेल्या विचारांच्या लोकांना चपराक बसविला त्याबरोबर पारंपरिक पद्धतीने चिता न रचता सांगलीतील गॅस दाहीनी त अंतिम संस्कार करुन पर्यावरणचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आणि हवेचे आणि पाण्याचे प्रदुषण टाळण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर अस्थींचे विसर्जन पाण्यात न करता त्या अस्थी घरात आणुन सर्वांनी मिळून मनोभावे आदरांजली अर्पण करुन बागेतील फळांच्या झाडात त्यांचा पणतु जीवन ज्योती आदाटे याचे हस्ते अस्थींचे विसर्जन करुन समाजाला वेगळा संदेश दिला आहे नेहमीप्रमाणे मातीच्या म्हणजेच तिसर जेवणाचा घाठ न घालता तेच जेवण सावली निवारा केन्द्रातील बेघर असलेल्या व्यक्तीच्या मुखात घालून ज्योती आदाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वेगळा पायंडा पाडला आहे क्रांती ज्योती सावित्रीमाई ची नुसती जयंती साजरी करुन उपयोग नाही तर त्या थोर माईचा विचार वास्तवात आणण्याचा विचार या सर्व महिलांनी मिळुन करुन दाखविला त्यांच्या आज्जीला 11 मुलं होती आता 6 शिल्लक आहेत 18 नातवंडे 25 परतंवड 5 खापरपतवंड इतका मोठा परिवार होता.अग्नी द्यायला मुलगाच हवा या विचारांच्या समाजव्यवस्थेला ज्योती आदाटेंनी चाप बसविला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.