शाहीर देवानंद माळी, बजरंग आंबी, रामचंद्र जाधव यांनी जनकल्याणकारी योजनांचा केला जागर
सांगली, दि. 10, : सांगली जिल्ह्याचे सुप्रसिध्द शाहीर देवानंद माळी, बजरंग आंबी व रामचंद्र जाधव यांनी महाविकास आघाडीच्या दोन वर्ष पूर्ती निमित्त शासनाने घेतलेल्या अनेक लोककल्याणकारी योजनांची आपल्या शाहिरी बाण्यांने विविध गावात प्रसिध्दी केली.
शाहीर बजरंग आंबी यांनी पलूस तालुक्यातील बांबवडे, भिलवडी व अंकलखोप येथे, शाहीर देवानंद माळी यांनी वाळवा तालुक्यातील आष्टाा, इस्लाघमपूर व वाळवा येथे तर शाहीर रामचंद्र नायकू जाधव यांनी जत तालुक्यातील माडग्याळ, गुड्डापूर व संख येथे आपल्या बहारदार कार्यक्रमांव्दारे शासनाच्या योजनांची प्रसिध्दी केली.
जिल्ह्यात दि. 11 मार्च रोजी शाहीर बजरंग आंबी तासगाव तालुक्यात सकाळी तासगाव शहर, सायंकाळी चिंचणी व मणेराजुरी येथे तर शाहीर रामचंद्र नायकू जाधव जत तालुक्यात सकाळी उमदी व सायंकाळी आटपाडी तालुक्यात दिघंची व आटपाडी येथे आपल्या पथकाव्दांरे कार्यक्रम सादर करणार आहेत. याचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.