Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दारू पाजून बलात्कार, लोकप्रिय महंतचा मोठा कारनामा उघड

 अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दारू पाजून बलात्कार, लोकप्रिय महंतचा मोठा कारनामा उघड


एका अल्पवयीन मुलीला परीक्षेत पास करण्याचे लालच दाखवून तिला सरकारी भवन सर्किट हाऊसमध्ये बोलावले. जिथे आपल्या शिष्यांची मदत घेऊन त्या अल्पवयीन मुलीला दारू पाजवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मध्य प्रदेशच्या रीवामध्ये ही घटना घडली असून एका लोकप्रिय महंतचा हा कारनामा उघड झाला आहे. मुलीने पित्यासोबत महंत आणि ४ शिष्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. दरम्यान आरोपी महंत श्रीराम जन्मभूमीचे माजी सदस्य आणि माजी खासदार रामविलास वेदांती यांचा शिष्य आहे.

नक्की काय घडले?

सिव्हिल लाईन ठाणा प्रभारी विनोद पांडे नावाच्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीला परीक्षेत पास करणार असे सांगून सैनिक शाळेजवळ बोलावले. त्याच्या बोलण्यात येऊन मुलगी तिथे पोहोचली. त्यानंतर आरोपी विनोद पांडे जो एक हिस्ट्रीशीटर आहे, त्याने आपल्या साथीदाराला पाठवून मुलीला राजनिवास येथे बोलावले. सर्किट हाऊसमध्ये विनोद पांडे, संत सीताराम आणि दोन इतर लोकं उपस्थित होते.

खोली हिस्ट्रीशीटरच्या नावाने बूक केली होती. पहिल्यांदा आरोपी दारू प्यायले त्यानंतर जबरदस्तीने मुलीला दारू पाजली. मग तीन आरोपी खोलीबाहेर गेले आणि संत सीतारामाने मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर पीडित मुलगी कशीबशी बाबाच्या हातातून सुडून पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने तक्रार दाखल केली. परंतु घटनेतील मुख्य आरोपी संत सीतारामसह इतर २ आरोपी फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा तपास करत आहेत. दरम्यान पूर्वीपासून महंत सीतारामवर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी विनोद पांडेला ताब्यात घेतले आहे.

घटनेनंतर भाजप नेत्यांसोबत व्हायरल झाले फोटो

रीवामध्ये १ एप्रिल ते १० एप्रिलपर्यंत संकट मोचन हनुमान कथा कार्यक्रमाचे आयोजन समदडिया गोल्ड मॉलमध्ये केले होते. यामध्ये संत सीताराम उपदेश देणार होता. या कार्यक्रमानिमित्ताने संत सीतारामने दिग्गजांची भेट घेतली होती. ज्यामध्ये प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष गिरीश गौतम, आयुक्त अनिल सुचारी, एसपी नवनीत भसीन यांचा समावेश होता. बलात्कारच्या घटनेनंतर आता सीतारामसोबतचे या दिग्गजांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.