Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या, औरंगाबाद हळहळलं

 वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या, औरंगाबाद हळहळलं


औरंगाबाद, 27 मार्च : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणीने वसतीगृहामध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये  घडली आहे.

धक्कादायक म्हणजे, आत्महत्येपुर्वी तरुणीनी सुसाईट नोट लिहून वडिलांची माफी मागितली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी रमेश काकडे (वय 22, राहणार सिल्लोड, औरंगाबाद ) असं  आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ही घटना शनिवार 26 मार्च रोजी सकाळी दहा वाजता उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी 3 पाणी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.

जुब्ली पार्क इथं वैष्णवी काकडे ही आणखी पाच मुली राहत होती.यातील तीन मुली काही दिवसांपूर्वी गावी गेल्या होत्या. यामुळे वैष्णवी आणि दोन मैत्रिणी शुक्रवारी २५ रोजी खोलीत होत्या. दरम्यान रात्री जेवण झाल्यानंतर तिघींनी समोरच्या खोलीत झोपण्याच ठरवलं. रात्री दोन वाजता दोन्ही मैत्रिणी झोपी गेल्या.

यावेळी वैष्णवीने 'मी फोनवर बोलते, तुम्ही झोपा' असे सांगितले. यामुळे दोन्ही मैत्रिणी झोपी गेल्या.  यावेळी वैष्णवी फोनवर कोणाशी तरी भांडत सुरू असल्याचा मैत्रिणींना आवाज आला. मात्र वैष्णवीचे तीन दिवसांपासून असेच वाद सुरू असल्याने त्यांनी दुर्लक्ष केलं.

दरम्यान शनिवार २६ मार्च रोजी सकाळी दहा वाजता एक मैत्रीण उठून मागे चार्जर घेण्यास गेली असता वैष्णवीने गळफास घेतला असल्याचे आढळून आले. तिने ही बाबा मैत्रिणींना सगितली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर पोलिसांच्या मदतीने तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. (तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे, नाहीतर काय मिळणार घंटा, अजितदादांनी तुफान फटकेबाजी) आत्महत्येआधी तिने ३ पाणी सुसाईट नोट लिहिली होती. यामध्ये तिने आपण डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही, बाबा मला माफ करा, असं पत्रात नमूद केलं आहे. वैष्णवी ही औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय कर्करोग रुग्णालय आणि महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकत होती. वैष्णवीच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.