Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली पत्नीसमोर झालेल्या अपमानाचा घेतला विचित्र बदला; जन्मदात्या वडिलांचा खेळ खल्लास

सांगली: पत्नीसमोर झालेल्या अपमानाचा घेतला विचित्र बदला; जन्मदात्या वडिलांचा खेळ खल्लास


जत, 26 मार्च : सांगली  जिल्ह्याच्या जत तालुक्यातील सोनलगी याठिकाणी बापलेकाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणानं किरकोळ कारणातून आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केली आहे.

वडील हे आपल्या बायकोसमोर सतत शिवीगाळ करत अपमान करतात, हा राग मनात धरून त्यानं वडिलांचा काटा काढला आहे. हत्येची ही थरारक घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. शिवाप्पा चंद्राम पुजारी असं हत्या झालेल्या 70 वर्षीय वडिलांचं नाव आहे.


या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी मुलगा मल्लिकार्जुन शिवाप्पा पुजारी याला अटक केली आहे. मृत शिवाप्पा पुजारी हे जत तालुक्यातील सोनलगी येथील सिद्धेरामेश्वर मंदिराचे पुजारी होते. ते आपल्या पत्नीसोबत राहत होते. त्यांना तीन मुलं आणि मुलगी आहेत.
पण सर्वजण वेगवेगळं राहतात. मृत शिवाप्पा पुजारी यांना दारू पिण्याचं व्यसन होतं. ते दररोज दारू पिऊन आपला मुलगा मल्लिकार्जुन याला शिवीगाळ आणि मारहाण करत होते. शिवाप्पा यांनी अनेकदा मल्लिकार्जुनच्या पत्नीसमोर त्याचा अपमान आणि मारहाण केली होती.
त्यामुळे आरोपी मुलगा मल्लिकार्जुनच्या मनात वडिलांबद्दल राग होता. घटनेच्या दिवशी गुरुवारी (24 मार्च) रात्री मृत शिवाप्पा यांचं मुलगा मल्लिकार्जुनच्या पत्नीसोबत भांडण झालं होतं. अभ्यासाला जाते म्हणाली अन् OYO रूममध्ये गेली; बीटेक विद्यार्थिनीचा भयावह शेवट हा वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात मल्लिकार्जुनने आपल्या वडिलांच्या डोक्यात काठीने जोरदार वार केला. तसेच त्यांना जोरात ढकलून दिले.
काठीचा मार आणि जमिनीवर जोरदार आदळल्याने रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत शिवाप्पा यांचा जागीच मृत्यू झाला. घरातील किरकोळ कारणातून झालेल्या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होतं पंचनामा केला आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारे संशयित आरोपी मुलगा मल्लिकार्जुन याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.