Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली महानगरपालिकेने अपेक्स कोव्हिड हॉस्पिटलला दिलेल्या परवानगीबाबत चौकशी

सांगली महानगरपालिकेने अपेक्स कोव्हिड हॉस्पिटलला दिलेल्या परवानगीबाबत चौकशी अहवाल लवकर सादर करणेबाबत भाजपचे सभागृहनेते विनायक सिंहासने व संघटन सरचिटणीस दीपक माने यांच्यावतीने महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना निवेदन.


सांगली ११ मार्च २०२२ :- अपेक्स हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे व अपुऱ्या व्यवस्थेमुळे ८७ पेक्षा जास्त निष्पाप पेशंट मयत झाले होते. त्यावेळी भारतीय जनता पार्टी चे वतीने अपेक्सच्या डॉक्टरांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच अपेक्स हॉस्पिटलला अपुरी कागदपत्रांच्या आधारे सांगली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती. पेंशटच्या मुत्युस डॉक्टरांच्या बरोबर महानगरपालिकेचे अधिकारी ही तेवढेच जबाबदार आहेत. 

तरी दिलेल्या परवनगीची चौकशी करून कारवाई मागणीसाठी  १९ जुन २०२१ रोजी सांगली महानगरपालिकेच्या महासभे दिवशी मयत पेंशटच्या नातेवाईकांच्या समवेत तिरडी मोर्चा काढुन आंदोलन केले होते. व भाजपच्या नगरसेवकांनी महासभेत आवाज उठविला होता. त्यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांनी रुलींग दिले होते. प्रशासनास अपेक्स हॉस्पिटलला दिलेल्या परवानगीची चौकशी करून चौकशी अहवाल महासभेच्या समोर सादर करण्याचे आदेश दिले होते. आदेश देऊन ६ ते ७ महिने झाले आहेत अजुन ही त्याबाबत चौकशी अहवाल प्रशासनाने सादर केला नाही. 

तरी सदर प्रकरणात दोषी अधिकारी यांना वाचवण्याचा प्रयत्न आहे. तरी लवकरात लवकर चौकशी अहवाल सादर करण्यात यावा यासाठी सभागृह नेते विनायक सिंहासने व भाजप संघटन सरचिटणीस दिपक माने यांनी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांना निवेदन दिले. यावेळी  लवकरात लवकर जर चौकशी अहवाल सादर केला नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी नगरसेवक युवराज बावडेकर, नगरसेवक राजेंद्रजी कुंभार, अभिमन्यू भोसले, ओबीसी युवा अध्यक्ष राहुल माने, कामगार आघाडी अध्यक्ष प्रियांनद कांबळे आदी उपस्थित होते...


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.