सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या ताफ्यात २४ ई बाईक दाखल!
महापौर आयुक्त सभापतींचा उपस्थितीत स्वच्छता निरीक्षकांना ई बाईक प्रदान ईलेक्ट्रीक वाहनांचा वापर करा, पर्यावरणाचे रक्षण करण्याचे महापालिका प्रशासनाचे आवाहन
सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या ताफ्यात २४ ई बाईक दाखल झाल्या आहेत. माझी वसुंधरा आणि रेस टू झिरो अंतर्गत घेण्यात आलेल्या ई बाईक स्वच्छता निरीक्षक वापरणार आहेत.
आशा प्रकारे ई बाईक वापरणारी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. या 24 ई बाईक खरेदी करून सांगली महापालिकेने प्रदूषण मुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे.
या ई बाईक महापौर दिग्विजय सुर्यवंशी, मनपा आयुक्त नितीन कापडणीस , स्थायी सभापती निरंजन आवटी आणि विरोधी पक्षेनेते संजय मेंढे , उपायुक्त राहुल रोकडे, आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे यांच्या उपस्थितीत स्वच्छता निरीक्षकांना प्रदान करण्यात आल्या. आपल्या दैनंदिन कामकाजासाठी स्वच्छता निरीक्षक यांना आपल्या प्रभागात फिरतीसाठी आणि अन्य कार्यालयीन कामकाजासाठी वापरता येणार आहेत.
या ई बाईकमुळे सांगली महापालिकेने यापूर्वीच प्रदूषणमुक्तीसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. त्यात या ई बाईकमुळे प्रदूषणमुक्त सांगली करण्यासाठी आणखीन ऊर्जा मिळणार आहे. आशा प्रकारे स्वच्छता निरीक्षकांना ई बाईक देणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच महापालिका आहे. ई बाईक प्रदान केल्यानंतर सर्व स्वच्छता निरीक्षकानी या ई बाईकवरून शहरात फेरी काढत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा, पर्यावरणाचे रक्षण करा असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून केले. वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर आणि अनिल पाटील, याकूब मद्रासी, ए वाय बारगिर यांनी या फेरीचे आयोजन केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.