Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ठाकरे सरकार धोक्यात? काँग्रेसच्या गोटातून आली धक्कादायक माहिती

 ठाकरे सरकार धोक्यात? काँग्रेसच्या गोटातून आली धक्कादायक माहिती


मुंबई, 30 मार्च : महाविकास आघाडी सरकारला  अडीच वर्ष पूर्ण झाली आहे. एकीकडे भाजपचे नेते सरकार पाडण्याचा मुहूर्त देत आहे. तर दुसकीकडे आता काँग्रेसचे आमदार महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचे वृत्त समोर आले आहे.

काँग्रेसच्या 25 आमदारांनी  नाराजी व्यक्त केली असून पक्षाध्यक्षा सोनिया गांधी  यांच्या भेटीसाठी वेळ मागितला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून आमदार निधीवरून वाद पेटला आहे. अलीकडेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांनी निधी देण्याबाबत घोषणा केली आहे. पण, काँग्रेसच्या आमदार अजूनही नाराज आहे.

काँग्रेसचे 25 आमदार सरकारवर नाराज आहे. आपल्या व्यथा मांडण्यासाठी सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. याबद्दल एक पत्रही सोनिया गांधींना लिहिण्यात आले आहे, असं वृत्त हिंदूस्तान टाईम्सने दिले आहे.काँग्रेसचे मंत्री सुद्धा आपलं ऐकत नाही. जर मंत्री आमदारांच्या मतदारसंघातील समस्येबाबत ऐकणार नसतील तर भविष्यात मतदारसंघात कसं काम करायचे? असा सवालच आमदारांनी उपस्थितीत केला आहे. तसंच, पक्षामध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे.

काँग्रेसचे मंत्री योग्य प्रकार आपली भूमिका मांडत नाही. प्रत्येक मंत्र्यांची आपल्या आमदारांची भूमिका मांडण्याची जबाबदारी आहे, पण ते कमी पडत आहे. राष्ट्रवादी आमदारांना जास्त निधी! उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांना भेटत असतात, त्यांच्या तक्रारी जाणून घेतात. त्यांच्या मतदारसंघासाठी लागणारा निधी देत असतात. पण, आम्हाला निधी मिळत नाही. राष्ट्रवादी एकाप्रकारे आमच्यावर हल्ला करत आहेत. जर सगळ्या गोष्टी समान राहिल्या तर सगळं काही व्यवस्थितीत राहिल, अशी भूमिकाच आमदाराने मांडली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.