झलकारीच्या कला प्रेरणा पुरस्कारांची घोषणा १३ मार्च रोजी आरग येथे होणार समारंभ
सांगली : झलकारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आरग , झलकारी ग्रामसंघ, राजमाता जिजाऊ ग्रामसंघ ,व उमेदशी संलग्न स्वयंसहायता समूहाच्या वतीने महिला दिवसाच्या निमित्ताने स्नेहसंमेलन ,पुरस्कार वितरण व महिला बचत गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .यावेळी विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या महिलांना कला प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष शशिकला गावडे व सचिव अधिका बाबर यांनी दिली.
आरग तालुका मिरज येथील नोंदणीकृत झलकारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व झलकारी ग्रामसंघ ,राजमाता जिजाऊ ग्रामसंघ, उमेशशी संलग्न स्वयंसहायता समूह यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १३/३/२०२२ रोजी महिला दिवसाच्या निमित्ताने स्नेहसंमेलन व पुरस्कार वितरण व महिला बचत गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी विविधक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना कला प्रेरणा पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, शाल, पुस्तक व पुष्प असे या पुरस्काराचे स्वरूप असून रविवार दिनांक १३/३/२०२२रोजी होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. हस्तकला प्रेरणा पुरस्कार २०२२ हा स्मिता राजेश खामकर ,कोल्हापूर यांना जाहीर करण्यात आला आहे .स्मिता खामकर या महाराष्ट्राची प्रमुख हस्तकला असणाऱ्या गोधडी या प्रकाराला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत .गोधडी विणण्याचे प्रशिक्षण देऊन त्याचे मार्केटिंग ही उत्तम रित्या करून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे .तर कला ललित कला प्रेरणा पुरस्कार २०२२ नवोदित अभिनेत्री प्रतीक्षा भगवान जाधव हिला जाहीर करण्यात आला आहे.टिटवी ए ब्राईट शॉपी व एक गाव तेरा भानगडी यासारख्या वेब सिरीज मध्ये अभिनय केला आहे व विविध मंचावर मृत्य सादरीकरणही केले आहे.
नांदेड येथील विजया सुधाकर काचावार यांना कला सामाजिक न्याय हक्क प्रेरणा पुरस्कार २०२२ ने सन्मानित करण्यात येणार आहे .काचावार या नांदेड येथील सामाजिक कार्यकर्त्या असून महिलांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल त्या सातत्याने वाचा फोडत असतात. विविध संघटना आणि संस्थांशी त्या संबंधित आहेत. ५० हून अधिक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या काचावार यांनी महिला न्याय्य हक्क करता स्वतःला वाहून घेतले आहे. गडहिंग्लज येथील अपूर्वा अनिल पाटील यांना कला प्रबोधन पुरस्कार २०२२ ने सन्मानित करण्यात येणार आहे. अपूर्वा पाटील या शिवव्याख्यात्या म्हणून प्रसिद्ध आहेत .शिव- शाहू - फुले - आंबेडकर विचारधारा तरुणात रुजवण्याचे मोलाचे कार्य त्या करतात .त्यांच्या या प्रबोधनाच्या कार्यकर्ताहा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर पुणे येथील नंदा शामराव जाधव यांना कला समाज सेवा प्रेरणा पुरस्कार २०२२ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नंदा जाधव या दामिनी बहुउद्देशीय महिला संस्थापीका अध्यक्षा, माहिती सेवा समीती पुणे जिल्हा अध्यक्षा,युवा योध्दा संघटना महाराष्ट्र सरचिटनीस,धर्मरक्षक छ. संभाजीराजे पाई पालखी सोहळा समिती विश्वस्थ, फाॅरम आॅफ एन्टलेक्च्युल सामाजिक संस्था डायरेक्टर,मुंढवा पोलिस स्टेशन दक्षता कमीटी,महिला कमीटी सदस्य, मानव विकास संरक्षण समिती महिला सचीव महाराष्ट्र राज्य,रणरागिणी महिला संस्था उपाध्यक्षा महाराष्ट्र तेजस्विनी संस्था सदस्य अशा वेगवेगळ्या संस्थांशी संलग्न व कार्यरत असून त्यांना विविध पुरस्कारांनी यापूर्वी गौरविण्यात आले आहे. आरग तालुका मिरज येथील कलगोंडा पाटील सेवा संस्था आरग या संस्थेला कला सक्षमीकरण प्रेरणा पुरस्कार२०२२ प्रदान करण्यात येणार आहे. के पी .या या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्थेच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणा करता कराटे प्रशिक्षण दिले जाते व विविध मर्दानी खेळांचे हे प्रशिक्षण दिले जाते. या कार्याची दखल घेऊन या संस्थेला कला सक्षमीकरण प्रेरणा पुरस्कार २०२२ने गौरविण्यात येणार आहे .
माजी सरपंच विशाखा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्राचार्य पी.बी.पाटील यांच्या कन्या व स.न.वि.वि.च्या संपादिका गीता पाटील, संजीवनी पाटील, माधुरी बोराडे हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर सरपंच सुरेखा नाईक,जिल्हा परिषदेच्या सदस्या सरिता कोरबू, पंचायत समिती सदस्य सुनीता पाटील,शिक्षक बँकेचे माजी चेअरमन हरिभाऊ गावडे व तुकाराम गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.यावेळी महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्रही सुरू करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पंचायत समितीच्या समन्वयक स्मिता शेळके व रेश्मा सातपुते यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या एका दिवसाच्या प्रदर्शनाचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा,तसेच अभिनेत्री प्रतीक्षा जाधव यांच्या लोकनृत्याचा अविष्कार व शिवव्याख्यात्या अपूर्वा पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमास महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहनही गावडे व बाबर यांनी केले आहे.
नंदा जाधव ,पुणे
विजया काचावार, नांदेड
स्मिता खामकर ,कोल्हापूर
अपूर्वा पाटील, गडहिंग्लज
प्रतीक्षा जाधव ,खानापूर
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.