Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

१४ व १५ मे २०२२ रोजी सांगलीत दक्षिण भारत जैन सभेचे शंभरावे अधिवेशन भव्य दिव्य स्वरुपात संपन्न होणार.. -रावसाहेब पाटील

१४ व १५ मे २०२२ रोजी सांगलीत दक्षिण भारत जैन सभेचे शंभरावे अधिवेशन भव्य दिव्य स्वरुपात संपन्न होणार..  -रावसाहेब पाटील 



दक्षिण भारत जैन सभेच्या शंभराव्या अधिवेशनाच्या आढावा बैठकीत बोलताना चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील, शेजारी अध्यक्ष रावसाहेब पाटील, दत्ता डोर्ले, भालचंद्र पाटील, सुरेश पाटील, राजाराम पाटील, संजय वडगावे, पा.पा.पाटील व प्रा. एन. डी. बिरनाळे.


सांगली दि. २९ : द. भा. जैन सभेचे ऐतिहासिक शंभरावे अधिवेशन दि. १४ व १५ मे २०२२ रोजी सांगलीच्या नेमिनाथनगरच्या कल्पद्रुम क्रिडांगणावर भरणार आहे. कर्नाटक व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कांही गणमान्य मंत्री महोदयांनी या अधिवेशनात उपस्थित राहण्याचे मान्य केले असून स्वागताध्यक्ष ना. राजेंद्र पाटील यड्रावकर व रावसाहेब दादांच्या नेतृत्वाखाली तयारी अंतीम टप्प्यात आहे.या अधिवेशनात लाखोंच्या संख्येने जैन समाज सहभागी होणार आहे असे सभेचे चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी सांगितले.  सांगली येथील जैन बोर्डिंग सभागृहात आयोजित अधिवेशन तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रावसाहेब पाटील बोरगाव हे होते. ते पुढे म्हणाले, '' स्मरणिका जाहिरात संकलनाच्या कामाला सर्व शाखांनी गती द्यावी. गावागावांत संपर्क करुन अधिवेशनात जैन समाज मोठय़ा संख्येने उपस्थित राहावा यासाठी प्रचार यंत्रणा राबविण्यात येणार आहे. सोशल मीडिया मधून वेळोवेळी माहिती दिली जाणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, ना. जयंतराव पाटील, ना. एकनाथ शिंदे, ना. बाळासाहेब थोरात, ना. आदित्य ठाकरे, ना. शंभूराजे देसाई, ना. सतेज ऊर्फ बंटी पाटील, ना. विश्वजीत कदम  यांना समक्ष निमंत्रणं दिली असून त्यांनी येण्याचे मान्य केले आहे. 

स्वागत व प्रास्ताविक डॉ. अजित पाटील यांनी केले. भालचंद्र पाटील यांनी उपस्थित अधिवेशन समिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपला सहभाग कसा राहील याबाबत बोलावे अशी सूचना केली. यावेळी सांगली व परिसरातील गावातील कार्यकर्त्यांनी या अधिवेशनासाठी निधी, स्मरणिका जाहिरात व उपस्थिती याबाबत संपूर्ण सहकार्य करु असे मनोगत मांडले. सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी अधिवेशनाच्या निमित्ताने भरीव निधी उभा करुन त्यामधून सांस्कृतिक भवन व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री ना. बसवराज बोम्मई व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सुरेश पाटील यांनी मौलिक सूचना केल्या. 

यावेळी समितीचे सेक्रेटरी प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी अधिवेशन आढावा बैठकीचे इतिवृत्त सांगून आभार मानले.यावेळी सांगली जैन बोर्डिंगच्या खोली बांधकामासाठी रु. २लाख ५१ हजाराची देणगी दिल्याबद्दल सौ. निर्मला व श्री बापूसाहेब किणीकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश पाटील समडोळी, सचिन पाटील, प्रदीप मगदूम  व सुरेश पाटील धामणी, सुरेश पाटील सांगली, राजाराम पाटील बुर्ली, श्वेता बिरनाळे अंकलखोप,माधुरी पाटील नांद्रे, सुभाष मद्वाण्णा, अभय पाटील, महावीर शेटे, अण्णासाहेब उपाध्ये, श्रीकांत कबाडगे, प्रणव चौगुले, महावीर व संजय पाटील नांद्रे, डिग्रजचे चौगुले व सभेच्या विविध शाखांचे पदाधिकारी, अधिवेशन समिती पदाधिकारी , सदस्य  व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.