पत्रकारांना स्वंरक्षणासाठी शस्त्रे आणि शस्त्र परवाने सरकारने विशेष कोटयातून मोफत द्यावे समाजरत्न मा. नितीनभाऊ बडेकर डिप्लोमा ग्रॅज्युएट जर्नालीस्ट स्टुडंट असोसिएशनची सरकारकडे मागणी
देशातील राज्यातील पत्रकारावर होणारे वाढते हल्ले, रोखण्यासाठी सरकारने पत्रकार संरक्षण कायदा केला. तसेच पत्रकाराला धमकावणे व पत्रकारावर होणारे हल्ले करणाऱ्या हल्लेखोरांना तीन वर्षे कैद, व ५० हजार रुपये दंड, अशी शिक्षा असून हा गुन्हा अजामीनपात्र असला तरी ही, सद्या पत्रकारांना धमकावण्याचे आणि त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांची मालिका थांबली नाही. तरी सरकारने पत्रकारांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रे आणि शस्त्र परवाने विशेष कोट्यातून मोफत द्यावे, अशी मागणी डिप्लोमा ग्रॅज्युएट जर्नालीस्ट स्टुडंट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष समाजरत्न नितीनभाऊ बडेकर यांनी मुखमंत्र्यांच्याकडे केली. ते प्रसार माध्यमाशी बालताना म्हणाले बातमीचा राग मनात धरून सद्या पत्रकारावर हल्ले मोठया प्रमाणात होत आहेत.
जर हाल्लेखोर पत्रकारांचा आवाज दाबण्यासाठी पत्रकाराला दिवसा ढवळ्या धमक्या देत हल्ले करीत असतील तर त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदया नुसार गुन्हे नोंद व्हावे. तसेच पत्रकारांच्या शारीरिक क्षमते पेक्षा हल्लेखोरांची संख्या जास्त असेलतर पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याचा पत्रकाराने स्वंरक्षणासाठी प्रतिकार करत असताना, वेळ प्रसंगी त्यांच्या हातून हल्लेखोरांचा वध झाल्यास सरकाने प्रतिकार करणाऱ्यास निर्दोष मुक्त जाहीर करावे, व त्यांच्या न्यायालय ची लढाई मोफत लढावी. व पत्रकारांना निदोष मुक्त होण्यात वेळ लागले. त्या कालावतीत त्यांच्या कुंटूंबास निवाह भत्त द्यावा. पत्रकारांच्यावर होणाऱ्या हल्याची चाहूल लागताच स्थानिक पातळीवर पोलिस संवरक्षण द्यावे, यासाठी पत्रकांच्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेवन पत्रकारांचा लढा तीव्र करणार आहे. वेळ प्रसंगी या मागणीसाठी मोठया प्रमाणात आंदोलन ही करणार असल्याचे मत. डिप्लोमा ग्रॅज्युएट जर्नालिस्ट स्टुडंट असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष समाजरत्न नितीनभाऊ बडेकर यांनी व्यक्त केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.