Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नवरा-बायकोचं भांडण लेकराच्या जीवावर; एका वर्षाच्या चिमुकलीला वडिलांनी जीवंत पुरलं

 नवरा-बायकोचं भांडण लेकराच्या जीवावर; एका वर्षाच्या चिमुकलीला वडिलांनी जीवंत पुरलं


मुंबई : नवरा बायकोच्या भांडणांचा बऱ्याचदा संतापजनक आणि धक्कादायक शेवट होतो हे आजपर्यंत आपण ऐकली आहेत. अशीच एक संतापजनक घटना वाशिममध्ये समोर आली आहे. एका निर्दयी बापाने आपल्या पोटच्या एका वर्षाच्या चिमुकलीला जिवंत खड्ड्यात पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला.

सुरेश घुगे असे सत्तावीस वर्षीय निर्दयी पित्याचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिसोड तालुक्यातील सुरेश घुगे हा आपल्या पत्नी कावेरी सोबत वाडी वाकद शेतशिवारातील गोठ्यावर राहतो. आरोपीला तीन मुली आहेत.

सुरेश हा नेहमी पत्नी कावेरीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यातून दोघांची नेहमी भांडणे व्हायची. सुरेशला दारूचे व्यसन जडले. काल दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले, या भांडणात सुरेशने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. कावेरी आपला जीव वाचवण्यासाठी गावाकडे धावत गेली. तिने आपल्या दीराला हकिकत सांगितली.

यानंतर काही माणसं शेताकडे गेली असता चिमुकली दिसत नसल्याने त्यांनी सुरेशला विचारणा केली. त्यानंतर त्याने हकीकत सांगितली. त्यानंतर मुलीचं शव उकरून बाहेर काढलं. नंतर याबाबतची सूचना रिसोड पोलिसांना दिली. रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपी सुरेश यास अटक केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.