जिल्ह्यातील विविध गावात लोककल्याणकारी योजनांचा जागर
सांगली, दि. 12, : सांगली जिल्ह्यात शाहीर देवानंद माळी, बजरंग आंबी व रामचंद्र जाधव यांनी महाविकास आघाडीच्या दोन वर्ष पूर्ती निमित्त शासनाने घेतलेल्या अनेक लोककल्याणकारी योजनांची आपल्या शाहिरी बाण्यांने विविध गावात प्रसिध्दी करत आहेत. आज शाहीर बजरंग आंबी यांनी तासगाव तालुक्यात पेड, सावळज व कवठेएकंद येथे, शाहीर देवानंद माळी यांनी कडेगाव तालुक्यात कडेगाव, कडेपूर व चिंचणी येथे तर शाहीर रामचंद्र नायकू जाधव यांनी आटपाडी तालुक्यातील माडगुळे, करगणी व शेटफळे येथे आपल्या बहारदार कार्यक्रमांव्दारे शासनाच्या योजनांची प्रसिध्दी केली.
जिल्ह्यात दि. १3 मार्च रोजी शाहीर बजरंग आंबी मिरज तालुक्यात सकाळी मिरज, सायंकाळी म्हैसाळ व मालगाव येथे, शाहीर रामचंद्र नायकू जाधव आटपाडी तालुक्यात सकाळी खरसुंडी व सायंकाळी भिवघाट व खानापूर तालुक्यात खानापूर येथे तर शाहीर देवानंद माळी वाळवा तालुक्यात सकाळी ताकारी व सायंकाळी कासेगाव व किल्ले मच्छिंद्रगड येथे आपल्या पथकाव्दांरे कार्यक्रम सादर करणार आहेत. याचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.