गोवंश हत्या बंदी कायदा केला आहे, काही दिवसांनी श्वास घेण्यावर बंदी घालतील - नागराज मंजुळे
पुणे : शाकाहारी, मांसाहारी ही कल्पना फक्त भारतातच आहे, काही समाजांमध्ये परिस्थितीमुळे मांसाहार करावा लागतो असे विधान दिग्दर्शक नागराज मंजूळे यांनी केले आहे.
तसेच आपल्याकडे गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला आहे, काही दिवसांनी श्वास घेण्यावर बंदी घातल्यास आश्चर्य वाटायला नको असेही मंजुळे म्हणाले. पुण्यात शहीद भगतसिंह स्मृतीदिनानिमित्त भगतसिंह विचारमंचाने नास्तिक मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमात नागराज मंजुळे यांनी आपले विचार स्पष्ट केले.
नागराज मंजुळे म्हणाले की माणूस जन्मतःच नास्तिक असतो. जे लोक वैफल्यग्रस्त असतो त्यांना देवाची गरज असते. जे लोक तर्क लावून विचार करतात त्यांना लोकांना देवाची गरज नसते. आपल्या देशात देव आणि धर्माच्या नावाने खूप हिंसा आणि रक्तपात झाला आहे, परंतु एका नास्तिकाला काफिर आणि दारूडे आणि वाईट असल्याचा अफवा पसरवल्या जातात असेही मंजुळे म्हणाले. तसेच शाकाहार मांसाहार ही कल्पना फक्त आपल्या भारतात आहे. अनेक समाजात आजही मांसाहार केवळ परिस्थितीमुळे करावा लागतो असे मंजुळे म्हणाले. आपल्याकडे अनेक राज्यांत गो वंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आल आहे. काही दिवसांनी श्वास घेण्यावर कर लावतील, उद्या श्वास घेण्यासही बंदी घातली तर आश्चर्य वाटायला नको असेही मंजुळे म्हणाले.
झुंड पाहून आमिर खानच्या डोळ्यात अश्रू
नुकतंच नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहून आमिर खानच्या डोळ्यांत अश्रू आले होते. आमिर खान म्हणाला होता की, अमिताभ बच्चन यांनी किती छान काम केले आहे. हा त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. त्याचा सर्वात मोठा चित्रपट. झुंडची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, राज हिरेमठ, सविता राज हिरेमठ, मंजुळे, गार्गी कुलकर्णी आणि मीनू अरोरा यांनी टी-सीरीज, तांडव फिल्म्स एंटरटेनमेंट आणि आटपाट यांच्या बॅनरखाली केली आहे. अभिनेता आमिर खान म्हणतो की प्रतिभावान चित्रपट निर्मात्याच्या मनावर छाप पाडणे सोपे नसते, परंतु या चित्रपटाने केवळ प्रभावित केले नाही तर प्रेरणा देखील दिली आहे. अभिनेत्याने टीम झुंडबद्दल आदर व्यक्त केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.