Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अल्पवयीन मुलांनी पॉर्न पाहून केला सामूहिक बलात्कार...

 अल्पवयीन मुलांनी पॉर्न पाहून केला सामूहिक बलात्कार...


पाटणा (बिहार): शेखपुरा जिल्ह्यातील बारबिघा पोलिस ठाण्याच्या परिसरात मोबाईलमध्ये पॉर्न व्हिडिओ पाहून पाच अल्पवयीन मुलांनी दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलींना सामुहिक बलात्कार केल्यानंतर 3 रुपये देऊन सदरील प्रकार कोणालाही न सांगण्यास सांगितले.पोलिसांना घटनेची माहिती मिळताच छापेमारी करत दोन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर चार मुले अजूनही फरार आहेत. हे सर्व सहा अल्पवयीन मुले बलात्कारापूर्वी मोबाईलमध्ये पॉर्न व्हिडिओ पाहत होते. 

त्यानंतर त्यांनी हे कृत्य केले आहे. बलात्कार करणाऱ्या सहा अल्पवयीन मुलांविरोधात सदरील घटनेतील पीडितेच्या आजीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, 'सोमवारी संध्याकाळी हे सहा मित्र 5-6 वाजेदरम्यान एका ठिकाणी मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहत होते. त्यानंतर त्यांनी शेजारील गावातील दोन मुलींना धरुन आणले आणि सामुहिक बलात्कार केला. सर्व मुले अल्पवयीन असून, त्याचे वय 10 ते 12 या वयोगटातील आहे. घटनेनंतर सोमवारी उशिरा रात्री पीडित मुलींच्या आजीने पोलिस तक्रार दिली आहे. सध्या दोन्ही पीडित मुलींना मेडिकलसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी दोन मुलांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, सामुहिक बलात्कार केल्यानंतर जेव्हा दोन्ही मुलींनी रडण्यास सुरुवात केली. तेव्हा आरोपी मुलांनी त्यांना तीन रुपये दिले. सदरील प्रकार कोणालाही न सांगण्याचे देखील आरोपी मुलांनी सांगितले होते. जेव्हा मुली घरी आल्या, तेव्हा त्या रडत होत्या. आजीने विचारल्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार सांगितला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.