माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत आणि रेस टू झिरो मोहिमेअंतर्गत कुपवाडमध्ये महापालिकेकडून जनजागृती
सांगली: माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत आणि रेस टू झिरो मोहिमेअंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून मनपाक्षेत्रात विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रम सुरू आहेत.
याअंतर्गत कुपवाड आर पी पाटील शाळेजवळ लकी महिला वस्ती स्तरीय संघ संस्थेकडून जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये मिशन रेस टू झिरोची माहिती महिलांना देण्यात आली. तसेच हनुमान नगर कुपवाड येथे स्त्री शक्ती वस्ती स्तरीय संघ बचत गटाकडून जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये मिशन रेस टू झिरोची माहिती महिलांना देण्यात आली. यासह शामनगर कुपवाड येथेही विश्वकर्मा महिला बचत गटाकडून जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये मिशन रेस टू झिरोची माहिती महिलांना देण्यात आली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.