कृष्णा महापूर विषयी लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करणार : खासदार धैर्यशील माने
सांगली : सांगली - कोल्हापूर जिल्ह्यातील महापूरविषयी येत्या लोकसभा अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करणार असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले. काल कोल्हापूर येथील खासदार धैर्यशील माने यांच्या निवासस्थानी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या सदस्यां बरोबर बैठक झाली यावेळी खासदार माने यांनी ही माहिती दिली.
सदर बैठकीमध्ये कृष्णा महापूर बाबतची कागदपत्रे आणि पुरावे खासदार धैर्यशील माने यांना देण्यात आले. यावेळी बोलताना खासदार माने म्हणाले की , यामध्ये केंद्रीय जल आयोगाची जी तत्त्वे दिली आहेत, ती राज्य जलसंपदा विभागाने पालन केले का? ही तत्वे संपूर्ण भारतात लागू असून महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्र,
तेलंगना यांनी अंमलबजावणी करतात का? डिसेंबर 2021 धरण सुरक्षा कायदा ( राजपत्र) केंद्र सरकारने प्रसिद्ध केले असून संदर्भात कृष्णा खोरेला पूरच येऊ नये,कितीही मोठा अवेळी पाऊस पडू दे,ढग फूटी होऊ दे याची जबाबदारी जलसंपदाची असून सातत्याने येणाऱ्या महापूराने पूरग्रस्त लोक भयभित झाले आहेत, त्या विभागातील दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कार्यवाही झाली हा ही प्रश्न ऊपस्थित करणार आहे.
खासदार माने पुढे म्हणाले की, याविषयी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिह शेखावत यांच्यामार्फत खुलासा घेणार आहे. तसेच श्री शेखावत यांच्या बरोबर कृष्णा महापूर नियंत्रण समिती सदस्य व राज्यातील सचिव यांच्यासोबत बैठकीचे आयोजन लवकरात लवकर स्वतः करणार असल्याचे त्यांनी सांगितले.या बाबत त्याचा रीतसर पाठपुरावा या अधिवेशनात करणार आहेत. सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यात मिळून कृष्णा खोरे महापूर नियंत्रण प्राधिकरण स्थापन करण्यासाठी ते स्वतः विशेष प्रयत्न करणार आहे यामध्ये तीन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पाटबंधारे विभाग, बांधकाम विभाग, कृषी विभाग,नगरविकास व अशासकीय सदस्य किंवा सेवानिवृत्त अधिकारी अशी कमिटी गठीत करणार आहेत
या वेळी संजय कोरे,विजयकुमार दिवाण,प्रदिप वायचळ,प्रभाकर केंगार,सर्जेराव पाटील,नटवर अटटल आदी उपस्थित होते.
सर्जेराव पाटील
8275257575
निमंत्रक समीती,
दि.12मार्च2022
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.