उध्योगरत्न अण्णासाहेब उपाध्ये यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कुपवाडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन...
उद्योगरत्न मा. श्री. आण्णासाहेब उपाध्ये सर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त दि.15 मार्च 2022 ते दि. 15 फेब्रुवारी 2023 पर्यत सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला क्रीडा व सांस्कृतिक प्रबोधनात्मक असे सुमारे 12 कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये खुल्या कराओके गायन स्पर्धा, वेगवेगळी आरोग्य तपासणी शिबिरे, भव्य चित्रकला, निबंध, रांगोळी, वत्कृत्व स्पर्धा, हॉलीबॉल स्पर्धा, खोखो स्पर्धा, वृक्षारोपन, व्यसनमुक्ती, विविध पोस्टर प्रदर्शने, महिला उत्कर्षासाठी विविध उपक्रम अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला करणेत आले आहे.
त्यापैकी येत्या मंगळवार, दि. 15 मार्च 2022 रोजी भव्य खुल्या कराओके गायन स्पर्धेचे आयोजन कुपवाड मेन रोड चौकात शाळेसमोर करणेत आले आहे. याचा सर्व संगीत प्रेमींनी लाभ घ्यावा तसेच प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला विश्वरूप क्लिनिक, अकुज ड्रीमलॅड, कुपवाड यांचे वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर हे वर्षभर सुरू राहिल. या वैद्यकीय सेवेचाही गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन वाढदिवस अमृत महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष बापू जाधव, उपाध्यक्ष राजू पवार, सचिव रितेश शेठ व सहकार्यवाह सनी धोतरे यांनी केले आहे. यावेळी समितीचे सर्व पदाधिकारी सल्लागार मोठ्या संख्येनेउपस्थित होते. सदर कराओके गायन स्पर्धा मंगळवार, दि. 15 मार्च 2022 रोजी सांय. 5.30 वा. वेळेत सुरू होईल याची नाव नोंदणी सांय. 5.00 वा. सुरू राहिल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.