सव्वादोन घराची काॅग्रेस
सन १९६०-६१ चा काळ असावा आमचे वडील ज्येष्ठ विचारवंत प्रा डाॅ पी बी पाटील हे लंडनहून
* Community Development * चा कोर्स पुर्ण करून मुंबईत बोटीने परतले. बोटीतून उतरल्यावर त्यांना निरोप मिळाला कि मुख्यमंत्री मान. यशवंतराव चव्हाण (थोरले साहेब) यांनी भेटायला बोलवलय! आमचे वडील सुद्धा जरा आश्चर्यचकीत झाले. ही पहिली भेट होती ! थोरल्या साहेबांनी या कोर्स ची माहीती करून घेतली व सरळ पी बी साहेबांना प्रस्ताव दिला कि तुम्ही दिल्लीला माझे बरोबर चला व केंद्र सरकारचे
* Educational Adviser * ची जबाबदारी घ्यावी ( असा प्रस्ताव ज्येष्ठ शिक्षणतज्ञ मान. जे. पी. नाईक यांनीपण दिला होता ) . पी बी साहेबांनी हा प्रस्ताव नम्रपणाने नाकारला व मला बहुजन समाजासाठी शिक्षणाचे काम करायचे आहे हे आवर्जुन सांगितले . थोरल्या साहेबांनी अजिबात नाराजी दाखवली नाही. बाकी ईतर गप्पा झाल्या त्यात शैक्षणिक , सामाजिक व राजकीय विषय होते . काॅग्रेस मध्ये येणेचापण प्रस्ताव दिला. यावेळेस पी बी साहेबांनी धाडसाने एक थेट प्रश्न थोरल्या साहेबांना विचारला -
* काॅग्रेस खरच समाजवादी आहे का?* एक तीक्ष्ण कटाक्ष टाकत थोरले साहेबांनी उत्तर दिले कि * ज्यावेळेस काॅग्रेस समाजवाद सोडेल त्यावेळेस समाज काॅग्रेस ला सोडेल * काही काळाने पी बी साहेबांनी काॅग्रेस मध्ये सक्रिय झाले व काँग्रेस समाजवादी ठेवण्यात भरीव असे योगदान दिले. या पी बी साहेबांनी सांगितलेल्या आठवणी लिहायचे कारण म्हणजे काल लागलेला चार राज्यातील निवडणूक निकाल . जी वाताहात काॅग्रेस ची झाली आहे ते बघून वाटतंय कि थोरल्या साहेबांनी सांगितलेल्या प्रमाणे खरेच काॅग्रेसने समाजवाद सोडला म्हणून समाजाने काँग्रेस ला सोडले ? मग महात्मा गांधींचा समाजवाद काँग्रेस ने हळू हळू संपवला का ? का समाजवाद हा शब्द कालबाह्य झालाय का ? का जनतेला समाजवादाचे गांभीर्य लक्षात येत नाही ? का जात , धर्म , संख्या यावर आधारित समाजाचे हित जपणे म्हणजे समाजवाद आहे का? अर्थात इतर पक्ष समाजवादी आहेत हे म्हणणे अतिश्याेक्ती होईल. स्वर्गीय ईंदिरा गांधी यांच्या पर्यंत काॅग्रेस समाजवादी होती , आणीबाणी वगळता. संपुर्ण देशावर सत्ता असलेली काँग्रेस हि आज केवळ सव्वादोन राज्यापुरती उरली !
महाराष्ट्रापुरता विचार केल्यास पाव तुकड्यांवर सत्तेत बसलेली काॅग्रेस व समाजवाद याचा काडीचाही संबंध दिसत नाही. तेच ते चेहरे मंत्रीपदावर वेटोळे घालून बसलेत. ना चिंतन शिबीरे होत आहेत ना नविन तरूण तरूणींची फळी ऊभी केली जात आहे ना नविन पिढीला कुठला भरीव कार्यक्रम ना आशावाद! पुर्वी पी बी साहेब फार मोठी ४ - ५ दिवसाची चिंतन शिबीरे स्वखर्चाने भरवत. त्याकाळी वाशिष्ठ ध्येये ठेवून उभा केलेल्या संस्था , इमारती यांचा वापर आज कशासाठी होतोय ?
साधारणपणे नऊ वर्षांपूर्वी राज्यातले काही बलाढ्य (?) नेते पी बी साहेबांना भेटायला आले होते . त्यावेळी काँग्रेस चे भवितव्य यावर फार परखड असे बोल पी बी साहेबांनी सुनावले होते . ते म्हणाले आम्ही जुने काँग्रेसजन , तुम्हाला आम्ही नको आहोत , आम्हाला डावलले हे समजू शकतो पण आम्ही काय विचार मांडत आहोत हे सुद्धा तुम्हाला नको झालेत याचे वाईट परिणाम तुम्हाला येत्या दहा-बारा वर्षात दिसतील व काँग्रेस पूर्णपणे विकलांग होईल व समाज काॅग्रेस पासून फारकत घेईल.
शेवटी एकदा काँग्रेसनेच काॅग्रेसवर घाला घातला .
शिवाजी पाटील
सांगली
११/०३/२०२२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.