सांगली विधानसभा क्षेत्रासाठी केंद्रीय सेतू भारतम योजने अंतर्गत 3 रेल्वे ओव्हर ब्रिज देण्याची मा. नितीन गडकरी ची घोषणा
सांगली येथे पुरुषोत्तम नारायण गाडगीळ यांच्या 190 व्या वर्षात पदार्पण निमित्त प्रगट मुलाखत दरम्यान केंद्रीय सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्री श्री.ना. नितीनजी गडकरी यांनी सांगली विधानसभा क्षेत्रांमधील रेल्वे ओव्हर ब्रिज बाबत मोठी घोषणा केली यामध्ये त्यांनी [1] कर्नाळ रोडवरील रजपूत गार्डन ते माधवनगर जकात नाका रस्त्याच्या रेल्वे फाटक वर रेल्वे ब्रीज करणेसाठी 75 कोटी,[ 2] नांद्रे ते शिरगाव, कवठे, वाजेगावकडे जाणारा रस्ताच्या रेल्वे फाटक वर रेल्वे ओव्हर ब्रिज करणेसाठी तसेच 67 कोटी तसेच [3] जुना बुधगाव रोड वरील शांतिनिकेतन जवळील रस्ताच्या रेल्वे फाटक वर रेल्वे ओव्हर करण्यासाठी 70 कोटी असे एकूण 212 कोटी अंदाजीत रकमेबाबत 3 रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी केंद्रीय सेतू भारतम योजने अंतर्गत सांगली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याची घोषणा मा नितीन गडकरी यांनी केली.
यावेळी नितीन गडकरी यांनी सांगली ते पेठ हा रस्ता चार महिन्यात सुरुवात करू असे सांगितले तसेच यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी पेठ सांगली मिरज 166 H मधील सांगली ते मिरज तसेच सांगली ते तानंग, पंढरपूर रोड हायवे फेज 2 चा डी.पी.आर. लवकरात लवकर करून सदर रस्ते नॅशनल हायवे मधून काँक्रिटीकरण करणेबाबत मागणी केली तसेच सांगली विश्रामबाग चौक व राजे यशवंतराव होळकर (विजयनगर) चौक येथे उड्डाणपूल करणेबाबत की निधीची मागणी केली यावेळी नितीन गडकरी गडकरी यांनी दिलेल्या सर्व पत्राची मागणी पूर्ण करणेसाठी संबंधित विभागास डी.पी.आर. करण्यासाठी आदेश देऊ असे आश्वासन दिले..
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.