एमएच 12, एमएच 14 ला पुन्हा टोल सुरू
खेड-शिवापूर- खेड-शिवापूर टोल नाक्यावर एमएच 12 आणि एमएच 14 या वाहनांना टोल घेतला जात नव्हता; पण आता एमएच 12 आणि एमएच 14 या वाहनांना असलेली टोलमाफी 1 मार्चपासून बंद करण्यात आली आहे.
पुणे-सातारा रस्त्याचे काम हे अंतिम टप्प्यात आले असून, वाहतूक सुरळीतपणे सुरू असल्याने हा निर्णय घेतला आहे, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी आणि खेड शिवापूर टोलनाका येथून हटविण्यात यावा, या मागण्यांसाठी काही वर्षांपूर्वी शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी याबाबत कोणताही निर्णय होईपर्यंत एमएच 12 आणि एमएच 14 या वाहनांना टोलमाफी देण्यात येईल,
असे 'एनएचएआय'ने सांगितले होते. तेव्हापासून एमएच 12 आणि एमएच 14 या वाहनांकडून खेड शिवापूर टोल नाक्यावर टोल घेण्यात येत नव्हता; परंतु 1 मार्च 2022 पासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर एमएच 12 आणि एमएच 14 या वाहनांकडून टोल घ्यायला सुरुवात करण्यात आली आहे.
रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात
रस्त्याच्या रुंदीकरणाचे अपूर्ण काम अंतिम टप्प्यात आहे. वरवे येथील उड्डाणपूल सुरू झाला असून वाहतुकीस कुठेही अडथळा होत नाही. म्हणून एमएच 12 आणि एमएच 14 वाहनांकडून टोल आकारण्यात येत आहे, असे 'एनएचएआय'च्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.