कर्मवीर पतसंस्थेच्या QR Code बँकींग सेवेचा शुभारंभ आधुनिक बँकींग सेवा सुविधा ही कर्मवीर पतसंस्थेची नवी ओळख असेल चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील
सांगली :- कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली च्या वतीने क्युआर कोड या आधुनिक बँकींग सुविधेचा शुभारंभ संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. ही सेवा देणारी कर्मवीर पतसंस्था ही सांगली जिल्ह्यातील पहिली संस्था आहे. नुकतेच संस्थेची ऑनलाईन विशेष सर्वसाधारण सभा संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानावरुन श्री. पाटील बोलत होते.
स्वागत व प्रास्ताविकात त्यांनी संस्थेच्या जानेवारी २०२२ अखेरच्या सांपत्तिक स्थितीचा आढावा सभासदांसमोर विस्तृतपणे सादर केला. संस्थेच्या ठेवी रु.६३८ कोटी असून रु. ४८० कोटीचे कर्ज वाटप केलेले आहे. संस्थेची गुंतवणुक रु. २०८ कोटी आहे. संस्थेचे खेळते भांडवल रु. ७४३ कोटी आहे. संस्थेचा स्वनिधी रु.५८ कोटी असून संस्थेचा एकूण व्यवसाय रु.१५०० कोटीकडे वाटचाल करीत आहे. कोणतीही आधुनिक बँकींग सेवा सभासदांना देण्यात कर्मवीर पतसंस्था पहिली असेल असा विश्वास त्यांनी सभासदांना दिला.
संस्था नव्याने कां ही सामाजिक व व्यावसायिक उपक्रम राबवत आहे. त्याची सविस्तर माहिती श्री. रावसाहेब पाटील यांनी ऑनलाईन विशेष सभेमध्ये दिली. संस्था सांगली व कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रामध्ये नव्याने दहा शाखा सुरु करीत आहे. त्याचा ठराव ही सभेमध्ये पास करणेत आला. संस्थेच्या मुख्यालयाचे इमारतीचा उद्घाटन सोहळा देखील मोठ्या उत्साहात घ्यावा याबाबतचा ठराव देखील सभासदांनी संमत केला. सभेपुढील विषयांचे वाचन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम यांनी केले. त्यांनी सभासदांना संस्थेच्या पुढील वाटचाली बाबत माहिती दिली. सर्व विषयांना सभासदांनी मोठ्या उत्साहात एक मताने मंजुरी दिली.
यावेळी सल्लागार अख्तर पिरजादे, प्रा. एम. एस. रजपूत, सीए. बी. डी. वांगीकर यांनी मनोगत व्यक्त करुन संस्थेच्या नविन योजनेचे स्वागत केले व संचालकांचे कौतुक केले. यावेळी व्हाईस चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, संचालक अॅड. एस. पी. मगदूम, डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, डॉ. रमेश वसंतराव ढबू श्री. लालासाहेब भाऊसाहेब थोटे, श्री. अ. के. चौगुले (नाना) संचालिका सौ. ललिता अशोक सकळे तज्ञ संचालक डॉ. एस. बी. पाटील (मोटके) नेटविन सिस्टीम्स नाशिक चे मार्केटीग मॅनेजर श्री. मसुद अत्तार यांचे सह मोठ्या संख्येने ऑनलाईन सभासद उपस्थित होते. आभार संचालक श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले यांनी मानले. सुत्र संचलन संजय सासणे यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.