Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुमच्या अकाउंटचा Password यापैकी एक नाही ना? असेल तर लगेच करा बदल

 तुमच्या अकाउंटचा Password यापैकी एक नाही ना? असेल तर लगेच करा बदल


नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी: सिक्योरिटी सोल्यूशन्स कंपनी  नॉर्डपासने  सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या कॉमन पासवर्ड्सची लिस्ट  जारी केली आहे. ही कंपनी दरवर्षी 'Top 200 Most Common Passwords' ची लिस्ट जारी करते. हॅकर्ससाठी  हे पासवर्ड्स हॅक करणं अतिशय सोपं आहे. अशात जर तुम्हीही विचार न करता तुमच्या कोणत्याही अकाउंटचा पासवर्ड सेट केला असेल, तर तो पासवर्ड बदलणं महत्त्वाचं आहे. एका लहानशा चुकीमुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. अतिशय कॉमन, सहज क्रॅक करता येणारे पासवर्ड नॉर्डपासने जारी केले आहेत.अतिशय कमकुवत पासवर्ड्समध्ये प्रियंका, प्रकाश, मनीष, पूनम, प्रशांत, प्रसाद, सुरेश, मनीषा, गायत्री, हनुमान, गौरव, हरि ओम, संतोष, सिमरन, संध्या, अभिषेक अशी अनेक नावं आहेत. 

जर तुम्ही पासवर्ड म्हणून तुमचं किंवा इतर कोणाचं नाव ठेवत असाल, तर ते अजिबात सुरक्षित नाही. अनेक लोक पासवर्ड म्हणून आपलं नाव, जन्मतारीख, फोन नंबर किंवा इतर काही पर्सनल माहिती ठेवतात. सिक्योरिटी एक्सपर्टनुसार, असे पासवर्ड अगदी काही सेकंदात हॅकर्स, सायबर क्रिमिनल्स  हॅक करतात. सायबर सिक्योरिटी एक्सपर्टनुसार, एका सिक्योर-स्ट्राँग पासवर्डमध्ये लेटर्स, नंबर्स, स्पेशल कॅरेक्टर्स अशा गोष्टी असाव्यात. असे कठीण पासवर्ड लक्षात ठेवणं कठीण ठरू शकतं. परंतु अशा स्ट्राँग, सिक्योर पासवर्डमुळे तुमचं अकाउंट, पैसे, पर्सनल डेटा अतिशय सिक्योर राहण्यास मदत होते.

तुमच्या अकाउंटसाठी स्ट्राँग पासवर्ड कसा सेट कराल? - सर्वात आधी पासवर्डमध्ये काही लेटर्स, संख्या, स्पेशल कॅरेक्टर्स अशा गोष्टी एकत्र करुन एक सिक्योर पासवर्ड तयार करा. - चुकूनही तुमची पर्सनल माहिती पासवर्ड, नाव, फोन नंबर, जन्मतारीख अशा गोष्टी पासवर्ड म्हणून ठेवू नका. तसंच पासवर्डमध्ये त्या टाकूही नका. - तुमचा पासवर्ड सतत बदलत राहा. - कधीही एकदा आधीच वापरलेला पासवर्ड पुन्हा वापरु नका. - तसंच दोन अकाउंटसाठी एकाच पासवर्डचा वापर करू नका. -पासवर्डसह स्ट्राँग सुरक्षेसाठी फेस रिकग्नेशन लॉक सेट करण्याचा प्रयत्न करा.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.