Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता बी. सी. स्कॉलरशिप फार्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची आमदार प्रणिती शिंदे यांची सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली

मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता बी. सी. स्कॉलरशिप फार्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची आमदार प्रणिती शिंदे यांची सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली होती फार्म भरण्यासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. 


महाराष्ट्र शासनाच्या वतीने बी सी स्कॉलरशिप फार्म भरण्यास 31 जानेवारी 2022 ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. अनेक विद्यार्थांना कोव्हीड 19 च्या महामारीमुळे उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, व इतर कागदपत्रे मिळण्याकरिता अडचणी येत आहेत. तसेच शासनाने उपलब्ध करून दिलेले पोर्टल स्लो आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी सदर फार्म भरण्यापासून वंचित आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता बी. सी. स्कॉलरशिप फार्म भरण्याची तारीख एक महिन्यासाठी वाढविण्यात यावी अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्याकडे आमदार प्रणिती शिंदे यांनी होती.  या मागणीचा विचार करून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.