Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माझी वसुंधरा अंतर्गत महापालिकेकडून गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी : कचऱ्यापासून खत निर्मितीबाबत मार्गदर्शन

माझी वसुंधरा अंतर्गत महापालिकेकडून गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी : कचऱ्यापासून खत निर्मितीबाबत मार्गदर्शन


सांगली : माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात दि. ३१ जानेवारी २०२२ रोजी अंगणवाडी क्रमांक ४१, भाग १६ आयुवेर्दिक दवाखाना येथे गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी करून औषध वाटप करण्यात आले. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला.

    यावेळी घरात निर्माण होणाऱ्या कचर्‍यापासून कंपोस्ट अणि बायोगॅस तयार करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सर्व कर्मचारी, नर्स, आशा, गरोदर स्त्रियां व कुटुंबीय उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.