Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांमध्ये शिथीलता - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांमध्ये शिथीलता - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 1,  : राज्य शासनाने दि. 31 जानेवारी 2022 रोजीच्या आदेशान्वये राज्यातील ज्या जिल्ह्यातील 18 वर्षावरील लोकसंख्येच्या दि. 30 जानेवारी 2022 रोजी कोव्हीड- 19 लसीचा पहिला डोस 90 टक्के व दुसरा डोस 70 टक्के पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्या जिल्ह्यांना दि. 8 व 9 जानेवारी 2022 रोजी जारी केलेल्या आदेशामधून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. तसेच राज्य शासनाने वरीलप्रमाणे लसीकरण पूर्ण झालेल्या जिल्ह्यांची यादी दिली असून त्यामध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सांगली डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 31 जानेवारी 2022 रोजीच्या शासन निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 9 व 10 जानेवारी 2022 रोजीच्या आदेशान्वये पारित केलेल्या आदेशामध्ये दि. 02 फेब्रुवारी 2022 रोजीचे 00.01 वाजल्यापासून खालीलप्रमाणे शिथिलता दिली आहे.

1. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने आणि सफारी नियमित वेळेनुसार ऑनलाइन तिकिटासह खुली राहतील.  सर्व अभ्यागतांना पूर्णपणे लसीकरण करणे आवश्यक आहे. कोविड 19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी ठराविक वेळी किती व्यक्तींना प्रवेश द्यावा त्याबाबत आवश्यक निर्बंध टाकावेत. 

2. जिल्ह्यातील सर्व प्रेक्षणीय स्थळे व पर्यटन स्थळे ज्यांचे तिकीट आहे / नाही ते नियमित वेळेनुसार खुले राहतील. सर्व अभ्यागतांना पूर्णपणे लसीकरण करणे आवश्यक आहे. कोविड 19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी ठराविक वेळी किती व्यक्तींना प्रवेश द्यावा त्याबाबत आवश्यक निर्बंध टाकावेत.

3. ब्युटी सलून आणि हेअर कटिंग सलूनसाठी लागू निर्गमित केलेल्या निर्बंधांच्या अधीन, स्पा 50% क्षमतेसह सुरु ठेवणेस परवानगी असेल.

4. अंत्यसंस्कारांना उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा नसेल. परंतु सदर ठिकाणी नागरिकांनी कोव्हीड अनुरुप वर्तनाचे पालन करणे बंधनकारक असेल.

5. स्थानिक प्राधिकरणांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार बगीचा, उद्याने खुली राहतील.

6. करमणूक / थीम पार्क कार्यरत क्षेत्राच्या 50% क्षमतेसह कार्यरत राहतील.

7. जलतरण तलाव, वॉटर पार्क 50% क्षमतेने सुरु करणेस परवानगी असेल.

8. रेस्टॉरंट्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे 50% क्षमतेसह सदर आस्थापनांसाठी शासनाने / स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या नियमित वेळेनुसार सुरु ठेवणेस परवानगी असेल.

9. भजन आणि इतर सर्व स्थानिक, सांस्कृतिक आणि लोक करमणुकीच्या कार्यक्रमांना सभागृह / मंडपाच्या 50% क्षमतेसह परवानगी असेल.

10. लग्नसमारंभास खुल्या मैदानाच्या अगर बंदिस्त सभागृहाच्या क्षमतेच्या 25 % व्यक्तीं मर्यादेपर्यंत अथवा 200 व्यक्ती, यातील जी संख्या कमी असेल तितक्या व्यक्तीस उपस्थित राहणेस परवानगी असेल.

11. जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 9 जानेवारी 2022 रोजीच्या आदेशान्वये पारित केलेल्या आदेशातील मुद्दा क्र. 1 (2) अन्वये रात्री 11.00 ते पहाटे 05.00 वाजेपर्यंत सांगली जिल्ह्यात लागू करणेत आलेली संपूर्ण संचारबंदी हटविणेत / रद्द करणेत येत आहे. परंतु नागरिकांनी कोव्हीड अनुरुप वर्तनाचे पालन करणे बंधनकारक असेल.

12. स्पर्धात्मक खेळांस 25% प्रेक्षकांच्या उपस्थितीस परवानगी असेल. ही क्षमता निश्चित खुर्च्या किंवा आसन व्यवस्थेची क्षमता म्हणून निर्धारित केली जाईल. सदर ठिकाणी प्रेक्षकांना उभे राहून आणि फिरून गर्दी करणेस प्रतिबंध असेल. 

13. जिल्ह्यातील आठवडा बाजार सबंधित स्थानिक प्राधिकरणाने घालून दिलेल्या अटी व शर्तीस अधीन राहून सुरु ठेवणेस परवानगी असेल. सदर ठिकाणी नागरिकांनी कोव्हीड अनुरुप वर्तनाचे पालन करणे बंधनकारक असेल.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 9 जानेवारी 2022 रोजीच्या आदेशान्वये अन्वये पारित केलेल्या आदेशामधील परिशिष्ट क्र.2 मध्ये दिलेल्या कोव्हीड- 19 योग्य वर्तनाच्या नियमांचे सर्व आस्थापनांनी त्याचे पालन करणे बंधनकारक असेल. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 9 जानेवारी 2022 रोजीच्या आदेशान्वये पारित केलेल्या आदेशामधील परिशिष्ट क्र. 2 मध्ये नमूद केल्याप्रमाणे गुन्हे दाखल करणेकामी सांगली जिल्ह्यातील सबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना या आदेशाद्वारे प्राधिकृत करण्यात येत आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.