Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लता मंगेशकरांच्या निधनानंतर केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय..

 लता मंगेशकरांच्या निधनानंतर केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय..


नवी दिल्ली : आपल्या सुरेख आवाजानं अवघ्या जगातील कोट्यावधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता. ठाकरे सरकारनं राज्यभर एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. अशातच आता लतादीदींच्या स्मृतीप्रित्यर्थ देशाच्या केंद्र सरकारने स्मरणार्थ टपाल तिकीट काढण्याचा निर्णय घेतला आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे.

केंद्र सध्या प्रस्तावित स्मारक स्टॅम्पसाठी काही डिझाइन पर्याय शोधत आहे. स्मारक टपाल तिकिटाच्या डिझाइनचे प्राथमिक काम सुरू झाल्याची माहिती देखील अश्विनी वैष्णव यांनी दिलीये. गायिका लता मंगेशकर यांना आपल्या सर्वांच्या वतीने ही छोटीशी श्रद्धांजली असेल. त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श केला, असंही अश्विनी वैष्णव म्हणाले आहेत.

तिकीटाच्या डिझाइनवर काम सुरू आहे आणि ते येथे ठेवण्यात येणार आहे. योग्य प्रसंगी लॉन्च केले जाईल, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. तीन प्रकारच्या टपाल तिकिटांचा विचार केला जात असल्याचा अंदाज आहे. स्टॅम्प एकतर पेन्सिल स्केच स्टॅम्प किंवा त्याच्या सर्वात लोकप्रिय छायाचित्रांपैकी एक चित्र किंवा त्याच्या चेहऱ्यासमोर माइक दर्शविणारे चित्र असू शकते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.