ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, विना तिकीट प्रवास करता येईल, जाणून घ्या कसा?
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र बहुतांश प्रवाशांना रेल्वेच्या नेहमीच्या वापरातील नियमांबद्दल पुरेशी माहिती नसते.
जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला घाईघाईत कन्फर्म ट्रेन तिकीट मिळाले नसेल, तर तुम्ही विना तिकीट ट्रेनमध्ये चढू शकता. रेल्वेच्या या खास नियमाबद्दल जाणून घ्या.
अचानक प्रवास करावा लागल्यास काय कराल?
अनेकवेळा प्रवाशांना अचानक प्रवास करावा लागतो, म्हणजेच त्यांना प्रवासाचे नियोजन न करताच प्रवास करण्याची वेळ येते. अशावेळी आधीच तिकीट काढता येत नसल्याचे दिसून येते. तुमच्या बाबतीतही असे घडले असेल तर त्याबद्दल बारकाईने जाणून घेतले पाहिजे. जर तुमच्याकडे आरक्षण नसेल, तर आता तुम्ही फक्त प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढू शकता आणि त्यानंतर तुम्हाला TTE शी संपर्क साधावा लागेल. तुम्हाला तिकीट तपासनीसकडे जावे लागेल आणि तेथे जाऊन तुम्ही तुमचे तिकीट काढू शकता. तुम्हाला तुमची सर्व माहिती तिकीट तपासकाला सांगावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या नियोजित स्टेशनपर्यतचे तिकीट काढावे लागेल.
आरक्षित सीट नसल्यास
येथे लक्षात घ्या की ट्रेनमध्ये सीटच्या कमतरतेमुळे, तुम्हाला आरक्षित सीट मिळण्यास त्रास होऊ शकतो, परंतु तिकीट तपासनीस तुम्हाला प्रवास करण्यापासून रोखू शकत नाही. जर तुमच्याकडे आरक्षण नसेल तर तुम्हाला 250 रुपये दंड आकारावा लागेल. प्रवाशांना तिकीटाच्या एकूण भाड्यासह 250 रुपये दंड आकारून तिकीट काढावे लागेल. प्लॅटफॉर्म तिकीट धारण केल्यानंतर, प्रवासी ट्रेनमध्ये चढण्यास पात्र ठरतो. प्लॅटफॉर्म तिकीट ज्या स्थानकावरून घेतले आहे त्याच स्थानकावरून प्रवाशाला भाडे द्यावे लागेल हे लक्षात घ्या.
तुमची ट्रेन चुकली तर
याशिवाय जर तुमची ट्रेन कोणत्याही कारणास्तव चुकली तर तिकीट तपासनीस पुढील 2 स्टेशनपर्यंत तुमची सीट कोणालाही देऊ शकत नाही. याशिवाय जर तुमची ट्रेन कोणत्याही कारणास्तव चुकली तर तिकीट तपासनीस पुढील 2 स्टेशनपर्यंत तुमची सीट कोणालाही देऊ शकत नाही.
मुंबई आणि उपनगरांतील स्थानकांचा कायपालट
दरम्यान मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. मुंबई आणि उपनगरांतील १९ स्थानकांचा कायापालट होणार आहे. १९ स्थानकांचा विकास करण्यासाठी ९४७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन स्थानकांवर प्रवाशांच्या सुविधांसाठी नवे फुटओव्हर ब्रिज, एलिव्हिटेट डेक्स, स्कायवॉक बनवणार आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट ३ ए अंतर्गत ही विकासकामे होणार आहे. लोकल्सची वाढती संख्या लक्षात घेता पश्चिम आणि मध्य रेल्वेवर दोन नव्या कारशेडचेही बांधकाम होणार आहे. मुंबई विकास रेल्वे कॉर्पोरेशननुसार ७ टप्प्यांत या स्थानकांचे विकासकाम होणार आहे. लवकरच या कामांसाठी कंत्राट निघणार आहे. काही दिवसांतच या विकासकामांना सुरूवात होणार आहे. या विकासकामांमध्ये अनेक छोट्या स्थानकांचाही समावेश असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्याने दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.